VIDEO : सलमान खानच्या घरी पुन्हा दिसली कतरिना कैफ

पाहा हा व्हिडिओ

VIDEO : सलमान खानच्या घरी पुन्हा दिसली कतरिना कैफ title=

मुंबई : सलमान खान आणि कतरिना कैफची जोडी 'टायगर' या सिनेमानंतर 'भारत' या सिनेमात दिसणार आहेत. मात्र या सिनेमाच्या अगोदर गुरूवारी सलमान खान आणि कतरिना कैफ ही जोडी एकत्र दिसली आहे. कतरिना फक्त सलमानलाच नाही तर संपूर्ण कुटुंबाला भेटली. कतरिना कायम त्याच्या कौटुंबीय फंक्शनमध्ये दिसली आहे. गुरूवारी सलमानच्या बहिणीच्या घरी गणपतीची स्थापना केली त्यावेळी कतरिना देखील होती. 

या दरम्यान कतरिना आणि सलमान खान बाप्पाची आरती करताना दिसली. हा व्हिडिओ सलमान खानचा भाओजी आणि भारतचे निर्माते अतुल अग्निहोत्रीने शेअर केला आहे. या संपूर्ण कुटुंबात सलमान खानचे संपूर्ण कुटुंबीय दिसत आहेत. या व्हिडिओ सलमान खानची आई, सलमान, अरबाज, सोहेल, आयुष शर्मा, अर्पिता, कतरिना आणि अतुल अग्निहोत्रीची पत्नी अलवीरा खान आरती करताना दिसले आहेत. 

कतरिना कैफचा हा व्हिडिओ इंस्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडिओ शेअर केला आहे. गुरूवारी सलमान आणि कतरिना मुकेश अंबानीच्या घरी देखील गणपतीच्या पाया पडताना दिसला. सलमान यावेळी ब्लॅक सिल्कच्या पठानी कुर्तात दिसत आहे. कतरिना कैफ यावेळी लाल रंगाच्या ड्रेसमध्ये दिसत होती.