सलमान खान विवाहित अभिनेत्रीच्या प्रेमात, म्हणतोय, 'मला लव्हेरिया झालायं'

अनेक अभिनेत्रींनंतर सलमानचं विवाहित अभिनेत्रीसोबत जोडलं जात आहे नाव, कोण आहे ती?  

Updated: Feb 15, 2022, 04:48 PM IST
सलमान खान विवाहित अभिनेत्रीच्या प्रेमात, म्हणतोय, 'मला लव्हेरिया झालायं' title=

मुंबई : अभिनेता सलमान खान कायम त्यांच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत असतो. सलमानचं नाव अनेक अभिनेत्रींसोबत जोडण्यात आलं आहे. सध्या भाईजान गर्लफ्रेंड लुलियाला डेट करत असल्याचं सांगण्यात येत. पण आता एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये सलमान एका विवाहित अभिनेत्रीला मी तुझ्यावर प्रेम करत असल्याचं सांगत आहे.

आता ज्या अभिनेत्रीवर सलमानचं जीव जडला आहे, ती अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून अभिनेत्री सनी लोओनी आहे. सलमानने व्हिडीओमध्ये  प्रेमाची कबुली दिली.

'बिग बॉस 5' मधून आपल्या हॉट अदांनी चाहत्यांच्या मनावर सनीने राज्य केलं. त्यानंतर ती 'बिग बॉस 14'च्या विकेंड का वारमध्ये दिसली होती. तेव्हाचा एक व्हिडीओ सध्या तुम्हाला तुफान व्हायरल होत आहे.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

सनी सलमानला विचारते, 'तुझा आजार कोणता आहे?'  यावर सलमान म्हणतो, मला तुझ्यावर प्रेम झालं आहे.. मला लव्हेरिया झाला आहे.' त्यानंतर सनी म्हणते मला पण झाला आहे. सनीने आपल्या बोल्ड आणि हॉट अदांनी चाहत्यांना घायाळ केलं आहे. 

सनी चाहत्यांना घायाळ करण्यात यशस्वी ठरली, त्यानंतर सलमान देखील तिच्या प्रेमात मग्न झाला. सनी सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर देखील तिच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे.