नवी दिल्ली : बॉलिवूडचा दबंग खान सलमान खानचा 'टाईगर जिंदा है' हा सिनेमा प्रदर्शनाच्या वाटेवर आहे. तर एकीकडे त्याने 'रेस 3' च्या चित्रीकरणालाही सुरूवात केली आहे.
आयएएनएसच्या वृत्तानुसार, 'रेस 3' मध्ये सलमान अॅक्शन करताना दिसणार आहे. मात्र तरी देखील या सिनेमासाठी त्याने वजन कमी केले आहे. सिनेमातील त्याची व्यक्तीरेखा लक्षात घेत त्याने तब्बल ८ किलो वजन कमी केले आहे. त्यासाठी तो विशेष डाएट करत आहे.
सलमानने 'रेस 3' च्या टीमसोबत फोटो शेअर केल्यापासून सिनेमाबद्दल प्रेक्षकांच्या मनात प्रचंड उत्सुकता आहे.
हा सिनेमा पुढील वर्षी ईदला प्रदर्शित होईल. सिनेमाच्या पहिल्या दोन पार्टचे दिग्दर्शन अब्बास मस्ताना यांनी केले होते. या सिनेमात सैफ अली खान, अक्षय खन्ना, बिपाशा बसु, अनिल कपूर आणि समीरा रेड्डी हे कलाकार प्रमुख भुमिकेत आहेत.