close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

सलमानने शेअर केला 'सिढी, साडी... लडकी'चा फोटो, प्रतिक्रियांचा पाऊस

'सिढी, साडी... लडकी'...

Updated: Jun 1, 2019, 03:15 PM IST
सलमानने शेअर केला 'सिढी, साडी... लडकी'चा फोटो, प्रतिक्रियांचा पाऊस

मुंबई : बॉलिवूड अभिनेता सलमान खान आणि अभिनेत्री कतरिना कैफ यांचा बहुचर्चित चित्रपट 'भारत' लवकरच प्रदर्शनच्या मार्गावर आहे. अली अब्बास दिग्दर्शित 'भारत' येत्या ईदला ५ जून रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. सलमानने नुकताच कतरिनासोबतचा एक फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. या फोटोमध्ये सलमान आणि कतरिना दोघेही पायऱ्यांवर उभे असल्याचं दिसत आहे. 'सिढी, साडी... लडकी' असं कॅप्शनही दिलं आहे. या फोटोवर अनेक चाहत्यांनी सलमानला कतरिनाशी लग्न करण्याचा सल्ला दिला आहे.

चाहत्यांकडून सलमान आणि कतरिनाची जोडीला नेहमीच पसंती मिळत आली आहे. काही वर्षांपूर्वी त्यांच्या रिलेशनशिपच्या चर्चांना उधान आलं होतं. त्यानंतर आता पुन्हा 'भारत'च्या निमित्ताने ही जोडी चाहत्यांसमोर येत असताना त्यांच्याकडून दोघांनी लग्न करण्याचा प्रांजळ सल्ला देण्यात येत आहे. 

'भारत' चित्रटातून सलमान-कतरिना ही जोडी पुन्हा एकदा स्क्रिन शेअर करणार आहे. कतरिनाने सलमान एक चांगला सल्लागार बनू शकतो असं टेलिव्हिजनवरील एका मुलाखतीत म्हटलं होतं. 'सलमान अतिशय मजेशीर आहे. सलमान एक असा व्यक्ती आहे जो तुम्हाला संपूर्ण सूट देतो, काही गोष्टी पूर्णपणे समजून घेण्यासाठी. सलमानचे स्वत:चे काही सिस्टम आहेत आणि कधी-कधी ते अतिशय कठिण वाटत' असल्याचंही कतरिनाने म्हटलं होतं. 

 
 
 
 

A post shared by Salman Khan (@beingsalmankhan) on

'मला सलमानच्या अशा गोष्टींची सवय झाली आहे. मी त्याच्यासोबत 'टायगर जिंदा है' यांसारखे चित्रपट केले आहेत आणि आता पुन्हा 'भारत'मध्येही आम्ही एकत्र काम केलं आहे. सलमान जास्त खोलात जाणार माणूस नाहीये. काही अभिनेते अभ्यास करताना अधिक सल्ले देतात, पण सलमान असा नाही. तो तुम्ही जसे आहात तसंच राहण्याची सूट देतो. त्यामुळे आपल्यातील कौशल्य खुलेपणाने बाहेर येतात.' असं कतरिना म्हटलंय. सलमानसाठी पर्यायी करियर काय असू शकते? असा सवाल कतरिनाला विचारला असता तिने 'सल्लागार...पिपल अॅडव्हायझर' असं कतरिनाने सांगितलं. 

'भारत'मध्ये सलमान वेगवेगळ्या लूकमध्ये दिसणार आहे. तरुणपणापासून ते वृद्धावस्थेपर्यंतचा प्रवास दाखवण्यात येणार आहे. 'भारत'मधील गाण्यांनाही प्रेक्षकांची चांगली पसंती मिळत आहे. 'भारत' साउथ कोरियन 'ओड टू माय फादर' या चित्रपटाचा हिंदी रिमेक आहे. ५ जून रोजी चित्रपट प्रदर्शित होणार आहे.