भारतच्या सेटवरुन सलमानने शेअर केला आईसोबतचा 'हा' खास व्हिडिओ

बॉलिवूडचा दबंग खान सलमान खान सध्या भारत सिनेमाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. 

Updated: Aug 21, 2018, 03:41 PM IST
भारतच्या सेटवरुन सलमानने शेअर केला आईसोबतचा 'हा' खास व्हिडिओ title=

मुंबई : बॉलिवूडचा दबंग खान सलमान खान सध्या भारत सिनेमाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. माल्टा येथे सलमानचे शूटिंग सुरु आहे. या शूटिंगची खास गोष्ट ही की, यावेळेस सलमान खानसोबत त्याची आईही आहे. माल्टामधून सलमान इंस्टाग्रामवर फोटोज आणि व्हिडिओज शेअर करत आहे. अलिकडेच सलमानने एक व्हिडिओ शेअर केला आहे. यात तो आई सलमा खान यांचा हात धरुन पायऱ्या चढत आहे.

सोशल मीडियावर हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहुन युजर्सने सलमानचे खूप कौतुक केले आहे. व्हिडिओच्या बॅकग्राऊंडला सलमान खान आणि शाहरुख खानच्या सुपरहिट सिनेमाचे करण अर्जुनचे ये बंधन तो प्यार का बंधन है... हे गाणे सुरु आहे. व्हिडिओ पोस्ट करत सलमानने लिहिले की, ''ये बंधन तो... प्यार का बंधन है... #भारत''

 

‪Yeh bandhan toh .. pyaar ka bandhan hai #Bharat ‬

A post shared by Salman Khan (@beingsalmankhan) on

यातून सलमानची आईसोबतची बॉन्डींग दिसून येते. सलमान खानचे आई सलमा खानसोबत खास नाते आहे. ५२ वर्षांचा सलमान अजूनही आपल्या आई-वडीलांसोबत राहतो. इतकंच नाही तर त्याला आईने बनवलेलं जेवण अतिशय आवडतं. म्हणूनच की काय, पण सलमान शूटिंगला आईला सोबत घेऊन गेला आहे.

यापूर्वी सलमानने आईसोबतचा एक फोटो शेअर केला होता. या फोटोला कॅप्शन देताना त्याने लिहिले की, ''माझ्या आयुष्यातील प्रेमासोबत...''

 

With the love of my life .

A post shared by Salman Khan (@beingsalmankhan) on

सलमानचा भारत सिनेमा अली अब्बास जफर दिग्दर्शित करत आहेत. या सिनेमाच्या निमित्ताने अली अब्बास आणि सलमान खान तिसऱ्यांदा एकत्र काम करणार आहे. 
कोरियाई सिनेमा 'ओड टू माय फादर'चा भारत हा रिमेक आहे. हा सिनेमा २०१४ मध्ये प्रदर्शित झाला होता.