जेलमधून बाहेर पडताच लहान मुलांसोबत दिसला सलमान खान

जेलमधून बाहेर आल्यानंतर सलमान लहान मुलांसोबत दिसला.

Updated: Apr 9, 2018, 02:54 PM IST
जेलमधून बाहेर पडताच लहान मुलांसोबत दिसला सलमान खान title=

मुंबई : जोधपूर सेंट्रल जेलमधून जामीन मिळाल्यानंतर सलमान मुंबईमध्ये मुलांसोबत वेळ घालवतांना दिसला. जोधपूरमधून मुंबईला आल्यानंतर दुसऱ्या दिवशी सलमानने मुलांसोबत वेळ घालवला. सलमानने या मुलांसोबत खूप मस्ती देखील केली. एक मुलाकडे तर सलमान चक्क आईस्क्रीम मागतांना दिसला. सोशल मीडियावर सलमान खानचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल होतो आहे. ज्यामध्ये सलमान मुलांमध्ये बसला आहे. सगळ्या मुलांसोबत तो मस्ती करतांना दिसत आहे. एक मुलगा आईस्क्रीम खात असताना सलमान त्याच्याकडे आईस्क्रीम मागतो. चाचूला पण आईस्क्रीम दे असं म्हणतो आणि तेथे उपस्थित मुलं जोरजोरात हसू लागतात.

शनिवारी सलमानला मिळाला जामीन

जोधपूर कोर्टाने सलमान खानला काळवीट शिकार प्रकरणी ५ वर्षाची शिक्षा सुनावली आहे. २ दिवस जेलमध्ये काढल्यानंतर त्याला जामीन मिळाला. सलमान खानला ५०००० रुपयांच्या जाचमुचलक्यावर जामीन मिळाला. सलमान खानला सशर्त हा जामीन देण्यात आला आहे. कोर्टाच्या परवानगी शिवाय तो देशाबाहेर नाही जावू शकणार. ७ मे २०१८ ला कोर्टात सलमानला हजर राहावं लागणार आहे.

सलमानचा आगामी 'रेस 3' सिनेमा

हा व्हिडिओ बॉबी देओलने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे. सलमान रविवारी त्याच्या को-स्टार साकिब सलीमच्या वाढजदिवसाच्या पार्टीमध्ये सहभागी झाला होता. 'रेस 3' मध्ये तो साकिब सलमान सोबत दिसणार आहे. सलमान खानचा लवकरच रेस ३ सिनेमा रिलीज होणार आहे.