सलमान खानच्या ट्विटमुळे चाहते पडले गोंधळात! RACE 3 चा ट्रेलर लांंबणीवर?

सलमान खान यंदाच्या ईदला त्याच्या चाहत्यांसाठी 'रेस 3' हा सिनेमा घेऊन येणार आहे.

Updated: May 14, 2018, 09:49 PM IST
सलमान खानच्या ट्विटमुळे चाहते पडले गोंधळात! RACE 3 चा ट्रेलर लांंबणीवर? title=

 मुंबई : सलमान खान यंदाच्या ईदला त्याच्या चाहत्यांसाठी 'रेस 3' हा सिनेमा घेऊन येणार आहे. रेमो डिसुझा दिग्दर्शिर 'रेस 3' या चित्रपटाचा क्लायमॅक्स काश्मिरमध्ये शूट करण्यात आला आहे. देशा-परदेशामध्ये या चित्रपटाचे विविध टप्प्यात शूट करण्यात आले आहे. 'रेस 3' चित्रपटातील पात्रांची सलमान खानने काही दिवसांपूर्वी ओळख करून दिली. आता चाहत्यांना 'रेस 3' च्या ट्रेलरची उत्सुकता आहे.  

 सलमान खानचं नवं ट्विट -  

 काही दिवसांपूर्वी सलमान खानने ट्विटरच्या माध्यमातून 15 मे रोजी 'रेस 3'चा ट्रेलर रीलिज होणार असल्याचं सांगितलं होतं. मात्र आज काही वेळापूर्वी केलेल्या ट्विटमध्ये ' कल का डाऊटफूल लग रहा है' असं ट्विट सलमान खानने केलं आहे. सलमानच्या या ट्विट संबंध कशाशी आहे हे त्यानं खुलेपणाने सांगितलेलं नाही. मात्र हे ट्विट रेस 3 च्या ट्रेलरबाबत असल्याचे अंदाज वर्तवण्यात येत आहेत. 

 

सलमानने दिली होती कबुली 

 

काही दिवसांपूर्वी सलमान खानने तयारी नसल्याने ट्रेलरला उशीर होत असल्याची कबुली दिली होती. त्यामुळे उद्या 'रेस 3' चा ट्रेलर कदाचित चाहत्यांच्या भेटीला येणार नसल्याची शक्यता आहे.

 

 रेस 3 असणार खास  

 रेस या चित्रपटाची तिसरी सीरिज 'रेस 3' मध्ये सलमान खान प्रमुख भूमिकेत झळकणार आहे. यापूर्वी सैफ अली खानने या चित्रपटाच्या प्रमुख भूमिकेत झळकला होता. आता रेमो डिसुजा दिग्दर्शित 'रेस 3' मध्ये सलमान खानसोबत जॅकलीन फर्नांडीस, अनिल कपूर, डेजी शहा, बॉबी देओल झळकणार आहे.