मुंबई : तुम्ही कधी सलमान खानला ऑनस्क्रिन किस करताना पाहिले आहे का? बॉलिवूडमध्ये कदाचित फक्त सलमानच असा एकमेव अभिनेता आहे ज्याने ऑनस्क्रिन किस एकदाही केलेले नाही. त्याच्या इतक्या वर्षांच्या अभिनयाच्या काळात त्याने एकदाही किस सीन दिलेला नाही. पण त्याने ही मर्यादा का राखावी किंवा असा निर्णय त्याने का घ्यावा, हे प्रश्न अजूनही अनेकांच्या मनात आहेत.
तर त्याचे कारण म्हणजे, १९८९ मध्ये सूरज बडजात्या यांच्या ‘मैंने प्यार किया’ या सिनेमाच्या चित्रीकरणादरमान्य जे काही घडले त्यामुळे सलमानने ऑनस्क्रिन किस न करण्याचा निर्णय घेतला. चित्रपटाच्या एका सीनमध्ये सलमानला भाग्यश्रीला हलकासा किस करायचा होता. पण भाग्यश्रीने हा सीन देण्यास स्पष्ट नकार दिला. दिग्दर्शकाला पुढे काय करावे हे कळतच नव्हते. म्हणून शेवटी यावर तोडगा काढण्यासाठी त्यांनी दोघांमध्ये काचेचा दरवाजा उभा केला आणि ते दृश्य चित्रीत केले.
यानंतर सलमानने कोणत्याही अभिनेत्रीसोबत ऑनस्क्रिन किस सीन दिले नाही. भाईजानच्या निकटवर्तीयांच्या म्हणण्यानुसार, या मागचे खरे कारण त्याचे कुटुंब आहे.
एका मुलाखतीत सलमान म्हणाला की, ‘अनेकदा आम्ही घरी सर्व एकत्र चित्रपट पाहतो. खासकरून इंग्रजी चित्रपट पाहताना त्यात इंटिमेट सीन असतील तर तिथे बसलेले सर्वच अवघडून जातात. यामुळेच मी माझ्या चित्रपटांमध्ये असे दृश्य देणं कटाक्षाने टाळतो.’