'दबंग' म्हणजे काय? सलमान देतोय उत्तर

'दबंग' शब्दाचा अर्थ सांगत तो साहसी पुरूषांचा सन्मान करणार आहे. 

Updated: Nov 19, 2019, 07:22 PM IST
'दबंग' म्हणजे काय? सलमान देतोय उत्तर

मुंबई : जगात प्रत्येक दिवसाला एक विशेष महत्त्व आहे. आज जगभरात आंतरराष्ट्रीय पुरूष दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे. या सणाचे औचित्य साधत दबंग अभिनेता सलमान खानने चाहत्यांना शुभेच्छा देत एक खास भेट आणली आहे. 'दबंग' शब्दाचा अर्थ सांगत तो साहसी पुरूषांचा सन्मान करणार आहे. सोशल मीडियावर त्याने एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. या व्हिडिओमध्ये अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा आणि अभिनेता अरबाज खान देखील दिसत आहे. 

'दबंग' शब्दाचा अर्थ हिंमत, तडफदार, नाटकी असा होतो. व्हिडिओच्या माध्यमातून सलमान, अरबाज आणि सोनाक्षी प्रेक्षकांना सांगतात तुमच्या आयुष्यात असा कोणी धाडसी, साहसी 'दबंग' असेल तर आम्हाला नक्की कळवा. त्याना 'दबंग ३ बॅज ऑफ ऑनर' देण्यात येईल.

व्हिडिओ पोस्ट करत कॅप्शन दिलं आहे 'आपल्या खास व्यक्तीचं नामांकन करत लोकांना #Dabanggg3BadgeoofHonour' आणि '@SKFilmsOfficia' सोबत टॅग करावे लागणार आहे. सलमानने अशा प्रकारचं ट्विट केल्यानंतर @SKFilmsOfficiaने देखील आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. 'सम्मान दिल्याबद्दल आभार! आशा करतो हे संबंध देखील करण-अर्जुन सारखे असतील.' 

सलमान त्याच्या आगामी 'दबंग ३' चित्रपटाचं उत्तमरित्या प्रमोशन करताना दिसत आहे. सलमान खानच्या 'दबंग ३' चित्रपटाची उत्सुकता चाहत्यांमध्ये अधिक आहे. मराठी कलाविश्वातील प्रसिद्ध अभिनेते आणि दिग्दर्शक महेश मांजरेकरांची मुलगी सई 'दबंग ३' चित्रपटाच्या माध्यमातून बॉलिवूडमध्ये डेब्यू करणार आहे.

चूलबूल पांडेच्या भूमिकेत झळकणाऱ्या सलमानच्या तरूणपणाच्या प्रेयसीच्या भूमिकेत सई दिसणार आहे. 'दबंग-३' चित्रपट २० डिसेंबर २०२० ला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.