मुंबई : अभिनेता संजय दत्त सध्या त्याची बहीण प्रिया दत्त यांच्यासह प्रचार करण्यात व्यस्त आहे. प्रिया दत्त या काँग्रेसच्या उमेदवार आहेत. संजयने त्यांच्या मतदार संघात मतदारांना काँग्रेसला मत देण्याचे आवाहन केले. त्याने चक्क हात जोडून मतांची मागणी केली. लोकसभा निवडणुकीच्या काळात राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. सर्व राजकीय पक्ष त्यांचे शक्ती प्रदर्शन जोरदार करताना दिसत आहेत. ७ टप्प्यात मदान पार पडणार आहे. त्यातील चौथ्या टप्प्याचे मतदान २९ एप्रिल रोजी होणार आहे.
सोमवारी काँग्रेस उमेदवार प्रिया दत्त मुंबईतील वांद्रे परिसरात प्रचार करत होत्या. त्यांचे मनोबळ वाढवण्यासाठी त्यांचे बंधू संजय दत्त प्रचारामध्ये उपस्थित होते. सांताक्रुज येथून प्रचार यात्रेचा नारळ फोडण्यात आला. सांताक्रुज नंतर जुहू गार्डन, खार दांडा, लिंकिंग रोड, बाध पूल, त्यानंतर कार्टर रोड आणि यूनियन बॅंक परिसरात प्रचार करण्यात आला. प्रचारा दरम्यान 'झी'सह झालेल्या मुलाखतीत मतदारंकडून चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे प्रियंका दत्त यांनी सांगितले.
साध्वी प्रज्ञा द्वारे करण्यात आलेल्या व्यक्तव्या बद्दल त्यांना विचारणा करण्यात आल्यानंतर त्यांनी उत्तर देण्याचे टाळले. त्यांच्या नंतर संजयला याबाबत विचारणा करण्यात आल्या नंतर त्यांने मी अभिनेता म्हणून आलो नसल्याचे त्याने सांगितले. मी एक भाऊ म्हणून माझ्या बहिणीसाठी तिचे मनोबळ वाढण्यासाठी आलो असल्याचे त्याने सांगितले.