संजू सिनेमानंतर आता संजय दत्त उलघडणार त्याच्या आयुष्याचे रहस्य!

सध्या बॉक्स ऑफिसवर एकाच सिनेमाचा बोलबाला आहे तो म्हणजे संजू.

Updated: Jul 12, 2018, 08:35 AM IST
संजू सिनेमानंतर आता संजय दत्त उलघडणार त्याच्या आयुष्याचे रहस्य! title=

मुंबई : सध्या बॉक्स ऑफिसवर एकाच सिनेमाचा बोलबाला आहे तो म्हणजे संजू. या सिनेमाने संजय दत्तचे आयुष्य प्रेक्षकांपुढे उघड करुन ठेवले आहे. पण पुन्हा एकदा संजय दत्तला जवळून जाणून घेण्याची संधी त्याच्या चाहत्यांना मिळणार आहे. संजय दत्तचे आयुष्य तुम्ही रुपेरी पडद्यावर पाहिले. आता पुस्तकाच्या माध्यमातून ही माहिती तुम्हाला वाचायला मिळणार आहे. बॉलिवूड अभिनेता संजय दत्त पब्लिशर हार्पर कॉलिन्सच्या सहयोगातून आत्मचरित्र संपादित करणार आहे. आपल्या वाढदिवसानिमित्त (२९ जुलै २०१९) हे आत्मचरित्र वाचकांच्या भेटीला येणार आहे.

संजय दत्त म्हणतो...

याबद्दल संजय दत्त म्हणाला की, मी एक असाधारण जीवन जगलो आहे. यात खूप चढ-उतार होते. माझ्याकडे तुम्हाला सांगण्यासाठी खूप इंटरेस्टींग गोष्टी आहेत. पण या मी आतापर्यंत कोणाही सोबत शेअर केल्या नाहीत. त्यामुळे मी माझ्या आठवणी आणि भावना तुमच्यासोबत शेअर करण्यास खूप उत्सुक आहे.

माहित नसलेल्या गोष्टीही येणार समोर

संजय दत्तच्या अनेक गोष्टी मीडिया किंवा लेखातून तुमच्या समोर आल्या असतील. पण आता त्याचे जीवन त्याच्या दृष्टीकोनातून पाहण्याची संधी प्रेक्षकांना लाभणार आहे.

प्रकाशक ‘हार्पर कॉलिन्स इंडिया’च्या नुसार, वाचक हे आत्मचरित्र वाचल्यानंतर संजय दत्तला खूप जवळून ओळखू शकतील. यात त्यांना आतापर्यंत माहित नसलेल्या, न पाहिलेल्या गोष्टी देखील वाचायला मिळतील.