Sanjay Leela Bhansali on Sharmin Segal's Casting : 'हीरामंडी' या वेब सीरिजची सध्या सगळीकडे चर्चा सुरु आहे. या सीरिजमध्ये संजय लीला भन्साळी यांची भाची शर्मिन सेगलनं देखील महत्त्वाची भूमिका साकारली. अनेकांनी त्यावरून सोशल मीडियावर शर्मिनला ट्रोल केलं. त्याचं कारण म्हणजे नेटकऱ्यांचे म्हणणे होते की तिला फक्त या कारणामुळे भूमिका मिळाली कारण ती संजय लीला भन्साळीची भाची आहे. शर्मिननं हे आधीच सांगितलं आहे की तिनं अनेकदा ऑडिशन दिल्यानंतर तिची निवड करण्यात आली. संजय लीला भन्साळी यांनी आता सांगितलं की शर्मिनही आलमजेबच्या भूमिकेसाठी योग्य होती. त्यासाठीच तिला या सीरिजमुळे घेण्यात आलं.
संजय लीला भन्साळीची भाची शर्मिनच्या हीरामंडीमधल्या कास्टिंगवर प्रश्न विचारण्यात आला. अनेक प्रेक्षकांना वाटतंय की तिनं या सीरिजमध्ये अभिनय करायला नको होता. आता स्वत: संजय लीला भन्साळी याविषयी 'इंडिया टुडे'ला दिलेल्या मुलाखतीत बोलले आहेत. ते म्हणाले की "तिचा चेहरा अगदी आलमजेबला साजेसा आहे. तुम्ही आलमजेबची भूमिका पाहिली असेल, तर तिला गणिका व्हायचे नाही, हे दिसून आले आहे. या भूमिकेसाठी मी नव्या चेहऱ्याच्या शोधात होतो. जिच्या चेहऱ्यावर निरागसता आहे. जिला तवायफ व्हायचे नव्हते. ती तवायफ सारखी बोलत नाही, ती तवायफसाऱकी चालत नाही. जिथे इतरांनी ते सगलं अनुभवलंय, मॅन्युपलेशन आणि मेंटल गेम सहन केला आहे. तुम्हाला असं कोणी ज्याच्यात निरागसता हवी. त्यामुळे मला वाटलं की शर्मिन योग्य निवड आहे. यामुळे नाही की ती माझी भाची आहे."
संजय लीला भन्साळी यांनी हे देखील सांगितलं की "शर्मिनच्या अनेक टेस्ट झाल्या होत्या. त्यानंतर तिला या भूमिकेसाठी कास्ट करण्यात आलं. मी तिला सांगितलं की तुला ही भूमिका योग्य पद्धतीनं साकारावी लागेल, कारण तू या इंडस्ट्रीतील नाही. तू कधीच अभिनय केलेला नाही. हे सगळे कलाकार गेल्या बऱ्याच काळापासून अभिनय करत आहेत. त्यांनी अशा भूमिका साकारल्या आहेत. त्यांना नखरे, ठुमके आणि नाजूकपणा कळतो आणि ते सगळं पडद्यावर कसं दाखवायचं हे देखील त्यांना कळतं."
हेही वाचा : 'पैशांसाठी मी घाणेरड्या...'; नीना गुप्ता यांचा मोठा खुलासा
या सीरिजच्या कास्टिंगविषयी बोलायचे झाले तर त्यात मनीषा कोईराला, शर्मीन सहगल, रिचा चढ्ढा, अदिती राव हैदरी, सोनाक्षी सिन्हा, फरदीन खान, फरीदा जलाल हे कलाकार दिसले.