साराला चाहत्यांचा गराडा, कार्तिक झाला बॉडीगार्ड

 अभिनेता कार्तिक आर्यन आणि अभिनेत्री सारा अली खान यांच्या नात्याच्या चर्चा सर्वत्र रंगताना दिसतात.

Updated: Jul 24, 2019, 07:28 PM IST
साराला चाहत्यांचा गराडा, कार्तिक झाला बॉडीगार्ड title=

मुंबई : बॉलिवूडमध्ये प्रेम आणि प्रेम विरहाच्या चर्चांनी तर थैमान घातलेलं असतं. कधी कोणाचं नाव कोणाशी जुळेल याचा पत्ता लागणार नाही. त्याच प्रमाणे कोण-कोणासाठी काय करेल हा तर चर्चेचा विषय आहे. सध्या अभिनेता कार्तिक आर्यन आणि अभिनेत्री सारा अली खान यांच्या नात्याच्या चर्चा सर्वत्र रंगताना दिसतात. सध्या त्यांचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. चाहत्यांच्या प्रचंड गर्दीमध्ये सुरक्षारक्षक असतानाही कशा प्रकारे कार्तिकने साराला बाहेर काढले आहे, ते या व्हिडिओमध्ये दिसत आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

#saraalikhan And #kartikaaryan Snapped Lucknowmore and Bollywood updates follow bybollywud.update #sonakshisinha #Akshaykumar #deepikapadukone #RanveerSingh #bollywood #urvashirautela #shahidkapoor #ananyapandey #varundhawan #aliabhatt #fashionblogger #shraddhakapoor #janhvikapoor #kartikaaryan #katrinakaif acqlinefernandeztigershroff kritisanon #fashion #priyankachopra #manavmanglani #saraalikhan #vickykaushal #viralbhayani #bollywoodstyle #arjunkapoor #rajkumarrao #deluxeBollywoo

कार्तिक सध्या त्याच्या चित्रपटाच्या चित्रीकरणात लखनौमध्ये व्यस्त आहे. तर आपल्या कथीत बॉयफ्रेंडला भेटण्यासाठी साराने लखनौमध्ये हजेरी लावली आहे. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. 

कार्तिक आणि सारा त्यांच्या आगामी 'लव आज कल २'मधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. इम्तियाज अली दिग्दर्शित 'लव आज कल २' १४ फेब्रुवारी २०२० मध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाशिवाय सारा 'कुली नंबर १' चित्रपटातून वरुण धवनसोबत स्क्रिन शेअर करणार आहे.

'कुली नंबर १' १ मे २०२० मध्ये प्रदर्शित होणार आहे. तर कार्तिक आर्यन 'पति पत्नी और वो'च्या रीमेकमध्ये दिसणार आहे. त्याच्यासोबत भूमी पेडणेकर आणि अनन्या पांडेही भूमिका साकारणार आहे.