सारा लग्नासाठी सज्जं, लग्नासाठी शोधतेय नवरा....

सह कलाकार कार्तिक आर्यन सोबत तिचे नाव जोडले गेले आणि सारा त्याला डेट देखील करत होती. हे स्वत: साराने एका मुलाखतीमध्ये मान्य केले होते.

Updated: Mar 19, 2021, 10:35 PM IST
सारा लग्नासाठी सज्जं,  लग्नासाठी शोधतेय नवरा.... title=

मुंबई : बॉलीवूड अभिनेत्री सारा अली खानने खूप कमी वेळेत ,स्वत:ची जागा निर्माण केली आहे. साराने केदारनाथ या सिनेमातून बॉलीवूडमध्ये ऍन्ट्री केली आहे. या सिनेमात सारा सुशांत सिंग राजपुत सोबत मुख्य भूमिकेत दिसली होती. त्यानंतर तिने सीम्बा, लव आजकल, कुली नं1 या सिनेमात ही काम केले. तिचे सिनेमे बॅाक्स ऑफिसवर जास्त कमाई करु शकले नाहीत, परंतु तिने मात्र चाहत्यांच्या मनात स्वत:ची जागा निर्माण केली आहे.

लव आज कल या सिनेमात सारा सोबत काम केलेला सह कलाकार कार्तिक आर्यन सोबत तिचे नाव जोडले गेले आणि सारा त्याला डेट देखील करत होती. हे स्वत: साराने एका मुलाखतीमध्ये मान्य केले होते.

आता सारा चक्कं एका नव्या नवरीच्या रुपात समोर आली आहे.  तिने तिचा लाल रंगाच्या घागऱ्यामधले तिचे फोटो  इंन्स्टाग्राम अकाउंटवर अपलोड केले आहेत. आणि त्याला कॅप्शन टाकले की, या सुशील, घरंदाज,आणि संस्कारी मुलीसोबत लग्नासाठी कोणी तयार आहे का?

पाहा साराचा पूर्ण फोटो

खरंतर हा फोटो साराने लग्नासाठी नाही तर, मनीष मल्होत्रा (Manish Malhotra)च्या नवीन कलेक्शनसाठी शूट केलेले फोटो आहेत. ज्यामध्ये ती खूप सुंदर दिसत आहे. आणि तिचे चाहते ही तिची प्रशंसा करण्यापासून स्वत:ला थांबवू शकत नाही. साराच्या फोटो खाली तिच्या फॅन्सने कौतुकांचे वर्षाव केले.