मुंबई : बॉलिवूडचे दोन दमदार कलाकार सैफ अली खान (Saif Ali Khan) आणि हृतिक रोशन 'विक्रम वेधा' (Vikram Vedha) या चित्रपटात एकत्र दिसत आहेत. सध्या दोघेही त्यांच्या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहेत. दोघेही वेगवेगळे कार्यक्रम आयोजित करून चित्रपटाचे प्रमोशन करत आहेत. या एपिसोडमध्ये तो नुकताच 'द कपिल शर्मा (The Kapil Sharma Show) शो'मध्ये पोहोचला.
तुम्हाला माहिती आहे की, प्रत्येक बॉलीवूड सेलिब्रिटी त्यांच्या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी कपिल शर्मा शोमध्ये जातो. याच शोमध्ये पोहोचलेल्या विक्रम वेधच्या स्टारकास्टने चांगलाच धुमाकूळ घातला आहे. विशेषत: सैफ अली खानने नेहमीप्रमाणे येथे खूप धमाल केली आणि कॉमेडी केली. पण आता आम्ही तुम्हाला सैफ अलीने सांगितलेला जुना किस्सा सांगणार आहोत. त्याने मुलगी सारा अली खानबाबत एक मोठा खुलासा केला होता.
हा किस्सा जेव्हा सैफ कपिल शर्मा या शोमध्ये आला होता. या शो मध्ये अर्चना पुरण सिंह सैफ अली खान ला विचारतो की, त्याच्या मुलांना कोणती बालगीते सर्वात जास्त आवडतात. सैफ अर्चनाच्या या प्रश्नावर उत्तर देताना सांगतो की, आता तर सर्व गाणे एलेक्सा गाते.
त्यासोबतच सैफ अली खान एक मजेशीर गोष्ट सांगतो. मी एक समरटाइम नावाची इंग्लिश बालगीत आहे ते म्हणायचो. तेंव्हा सारा खूपच लहान होती. तिने डोळे उघडून सांगितले ‘पप्पा प्लीज गाऊ नका’ त्यानंतर मी गाऊ नाही शकलो. मुले सुद्धा सांगतात की गाऊ नका. आश्चर्याची गोष्ट ही आहे की कपिल शर्मा शो चा आत्ता आलेला प्रोमो विडीओ या वेळी सोशल मिडियावर खूपच वायरल होताना दिसत आहे. हा व्हिडिओ फोन भूत या सिनेमाच्या प्रमोशनवेळचा आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर पुन्हा एकदा व्हायरल होत आहे.
याच चित्रपटाच्या विक्रम वेधच्या प्रमोशनसाठी सैफ अली खान कपिल शर्माच्या शोमध्ये अभिनेत्री राधिका आपटेसोबत दिसला. यादरम्यान या शोमध्ये चित्रपटाशी संबंधित इतर कलाकारही उपस्थित होते, परंतु चित्रपटात महत्त्वाची भूमिका साकारणारा हृतिक रोशन दिसला नाही. तो कपिलच्या शोमध्ये इतरत्र चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त असल्याने तो येऊ शकला नाही, असं सांगण्यात येत आहे.