मुंबई : कॉफी विथ करण सिझन 6 च्या चौथ्या एपिसोडमध्ये सारा अली खान आणि सैफ अली खान हे बाप लेक पाहुणे म्हणून आले होते. या शोमध्ये पहिल्यांदा सैफ अली खान आपल्या मुलीसोबत आला होता. या दरम्यान सैफ आणि सारा यांनी अनेक सिक्रेट्स शेअर केले. साराने या शोमध्ये सैफ आणि करीनाच्या लग्नाबद्दलची एक खास गोष्ट शेअर केली आहे.
साराने सांगितलं की, स्वतः अमृता सिंहने म्हणजे माझ्या आईने सैफ आणि करिनाच्या लग्नाला तयार केलं होतं. ही गोष्ट अतिशय धक्कादायक आहे. तसेच साराने सैफ आणि आई अमृता सिंहबाबत काही गोष्टी शेअर केल्या. ती म्हणाली माझी मॉम आणि पापा त्या वेळी जास्त आनंदीत होते जेव्हा ते एकत्र राहत असतं. आता सैफ, करिना खुश आहे. आणि माझी आई देखील त्यामुळे आम्ही देखील खुश आहोत.
तसेच सैफने सांगितलं की, करीना कधीत कोणती गोष्ट सिक्रेट ठेवू शकत नाहीत. पण साला आणि सोहा या बेस्ट सिक्रेट कीपर आहेत.
All's well that ends well!#KoffeeWithKaran #KoffeeWithSara #KoffeeWithSaif pic.twitter.com/l1YKD0xF40
— Star World (@StarWorldIndia) November 18, 2018
अमृता सिंहला लिहिलं पत्र सैफ अली खान या शोमध्ये सांगितलं की, त्याने लग्नाच्या दिवशी अमृता सिंहला पत्र लिहिलं होतं. त्या पत्रात त्याने अमृताला पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या होत्या. महत्वाचं म्हणजे ते पत्र पाठवण्याअगोदर करीनाने ते वाचलं देखील होतं. करीना याबाबतीत खूप सपोर्टिव असल्याचं सैफने सांगितलं. सैफने हा सगळा प्रकार साराला सांगितला तेव्हा ती म्हणाली की, मी तुमच्या लग्नाला येत आहे.