Photo Viral : सारा अली खानचा विंटर स्टायल लूक पाहिलात का...

सध्या सारा अली खानच्या चर्चा सर्वत्र रंगत आहेत. 

Updated: Jan 30, 2021, 11:02 AM IST
Photo Viral : सारा अली खानचा विंटर स्टायल लूक पाहिलात का... title=

मुंबई : अभिनेत्री सारा अली खानने फार कमी काळात चाहत्यांच्या मनात एक वेगळी जागा निर्माण केली आहे. तिच्यातील अभिनय कौशल्य आणि स्वभावामुळे ती कायम चाहत्यांच्या पसंतीस उतरते. 'केदारनाथ' चित्रपटाच्या माध्यमातून बॉलिवूड विश्वात पदार्पण करणारी सारा आज प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक आहे. चाहत्यांच्या मनात कायम असणारी सारा सोशल मीडियावर देखील ऍक्टिव्ह असते. सतत स्वतःचे वेगळ्या अंदाजातील फोटो शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहते. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Sara Ali Khan (@saraalikhan95)

आता देखील तिने सोशल मीडियावर तिने विंटर स्टायलचे फोटो पोस्ट केले आहेत. तिचा हा खास अंदाज चाहत्यांच्या चांगलाचं पसंतीस पडला आहे. आता पोस्ट केलेल्या फोटोंमध्ये ती लॉन्ग हूडीमध्ये दिसत आहे. तिचा फॅशन सेन्स अत्यंत निराळा असल्याचं या फोटोंमध्ये दिसत आहे. 

साराची ही पोस्ट सध्या मोठ्या प्रमाणात व्यारल होत आहे. काही दिवसांपूर्वी तिने मालदीवमधील फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले होते. सारा तिचा भाऊ इब्राहिम अली खान आणि अमृता सिंह सोबत मालदीवला सुट्ट्यांकरीता गेली होती. 

नुकताच सारा आणि अभिनेता वरूण धवन 'कुली नं 1' चित्रपटात झळकले होते. या चित्रपटाच्या माध्यमातून त्यांनी पहिल्यांदात एकत्र स्क्रिन शोअर केली. आता साराने तिच्या आगामी 'अतरंगी रे' चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरूवात केली आहे. या चित्रपटात सारा व्यतीरीक्त अक्षय कुमार, धनुष आणि निमरत कौर देखील झळकणार आहेत. चित्रपटाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी आनंद एल राय यांच्या खांद्यावर आहे.