आजीच्या पुरस्कारसोहळ्यात घातलेला ड्रेस साराने केला Repeat

अनुष्का-विराट यांचे रिसेप्शन मुंबईत दिमाखात पार पडले. 

Dakshata Thasale दक्षता ठसाळे - घोसाळकर | Updated: Dec 28, 2017, 08:22 PM IST
आजीच्या पुरस्कारसोहळ्यात घातलेला ड्रेस साराने केला Repeat title=

मुंबई : अनुष्का-विराट यांचे रिसेप्शन मुंबईत दिमाखात पार पडले. 

या रिसेप्शनला क्रिकेट आणि बॉलिवूड इंडस्ट्रीमधील अनेक कलाकार, क्रिकेटपटूंनी उपस्थिती लावली. यावेळी क्रिकेटचा देव समजला जाणारा सचिन तेंडुलकरही त्याच्या कुटुंबियांसोबत उपस्थित होता. यावेळी सगळ्यांच्या नजरा या साराकडे खिळल्या होत्या. साराने घातलेला ड्रेस हा यावेळेचा चर्चेचा विषय होता. 

साराच्या ड्रेसचं हे आहे गुपित... 

साराने आजीला लंडन येथे मिळालेल्या पुरस्कार सोहळ्यातही हाच ड्रेस घातला होता. साराची आजी अॅनबेल मेहता या मुंबईतील एनजीओ 'अपनालय' येथे समाजातील दुर्लक्षित जाती-जमातीच्या लोकांसाठी काम करतात. यासाठी त्यांना लंडन येथे पुरस्कार देण्यात आला होता. साराने यावेळी आजीबरोबर फोटोही काढले होते. आता सध्या आताचा विरूष्काच्या लग्नातला फोटो आणि आजीच्या सोहळ्यातील फोटो सोशल मीडियावर शेअर होत आहे. 

पांढऱ्या शॉर्ट ड्रेसमधली सारा... 

साराने या रिसेप्शनमध्ये पांढऱ्या रंगाचा क्युट बार्बी डॉल फ्रॉक घातला होता. साराचा हा सिंपल पण देखणा लुक लक्षवेधी ठरला. साराचे सौंदर्य पाहून अनेकदा तिच्या बॉलिवूड डेब्यूविषयी चर्चा होतात आणि अनेकदा तिचे नावही कोणा न कोणासोबत जोडले जाते. साराने जर फिल्म इंडस्ट्रीत प्रवेश केला तर तिचे फॅन्स नक्कीच खूश होतील यात शंकाच नाही.