मुंबई : अभिनेत्री चाहत खन्नाचा पती फरहान शाहरुख मिर्झाला सध्या सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. फरहान शाहरुखच्या अटकेला सर्वोच्च न्यायालयाने पुढील आदेशापर्यंत स्थगिती दिली आहे. यासह कोर्टाने असेही म्हटले आहे की, मिर्झाने तपासात सहकार्य करावे. मिर्झाच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने चाहत खन्ना आणि मुंबई पोलिसांना नोटीसही बजावली आहे. आता या प्रकरणी पुढील सुनावणी 8 नोव्हेंबर रोजी होणार आहे.
फरहान शाहरुख मिर्झाने सुप्रीम कोर्टात धाव घेत मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाला आव्हान दिल्याने त्याची अटकपूर्व जामीन याचिका फेटाळली. चाहत खन्नाने पती फरहान शाहरुख मिर्झावर अनैसर्गिक शारीरिक संबंध आणि जबरदस्तीने गर्भपात यांसारखे गंभीर आरोप केले आहेत. 2018 साली चाहतच्या तक्रारीच्या आधारावर ओशिवारा पोलीस ठाण्यात फरहान विरोधात एफआरआय दाखल केली.
कोण आहे चाहत खन्ना?
'बडे अच्छे लगते है' चित्रपटाच्या माध्यमातून चाहतला लोकप्रियता मिळाली. पण आता तिच्याकडे काम नसल्यामुळे ती कामाच्या शोधात आहे. अभिनयाशिवाय चाहत कपड्यांचा देखील व्यावसाय करते. चहातच्या खासगी आयुष्याबद्दल सांगायचं झालं तर तिचे दोन झालीये. तिला दोन मुलं आहेत. ती सिंगल मदर म्हणून तिच्या मुलांचा सांभाळ करते.