आर्यन खान घरी आल्याच्या आनंदात उजळून निघाला शाहरुखचा बंगला 'मन्नत', पाहा फोटो

शाहरुख खानच्या 'मन्नत' या बंगल्याची अनेक फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आले आहेत.

Updated: Oct 30, 2021, 10:56 PM IST
आर्यन खान घरी आल्याच्या आनंदात उजळून निघाला शाहरुखचा बंगला 'मन्नत', पाहा फोटो  title=

मुंबई : शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान मुंबईच्या आर्थर रोड जेलमधून आजच घरी पोहोचला. शनिवारी आर्यन खानच्या रिलीजपूर्वीच त्याच्या घरी जोरदार स्वागताची तयारी करण्यात आली होती. शाहरुख खानच्या 'मन्नत' या बंगल्याची अनेक फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आले आहेत. ज्यामध्ये 'मन्नत' पूर्णपणे सजलेला दिसतोय. आर्यन घरी आल्याच्या आनंदात हा बंगला खूपच भव्य दिसत आहे.

योगेन शाह ने त्याच्या इंस्टाग्रामवर शाहरुख खानच्या 'मन्नत' या बंगल्याचा व्हिडिओ शेअर केला आहे. बंगल्याची सजावट पाहून अंदाज लावला जाऊ शकतो की शाहरुख आणि गौरी खान आपल्या लाडक्या आर्यन खानला भेटण्यासाठी किती उत्सुक होते. आर्यन खान गेल्या २६ दिवसांपासून कुटुंबापासून दूर होता. क्रूझ ड्रग्ज प्रकरणी एनसीबीने 3 ऑक्टोबर रोजी त्याला अटक केली होती. गुरुवारी मुंबई उच्च न्यायालयाने आर्यन खानला जामीन मंजूर केला.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

याआधी शाहरुख खानचा एक व्हिडिओही समोर आला होता ज्यामध्ये तो मन्नत ते आर्थर रोड जेलमध्ये जाताना दिसत होता. आर्यनची आज सुटका झाली. अशामध्ये त्याला आशा होती, मात्र कडक नियमांमुळे तसं होऊ शकलं नाही. या संदर्भात तुरुंगातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितलं की, "कायदा सर्वांसाठी समान आहे. आम्ही कोणाकडेही विशेष लक्ष देत नाही.