Shah Rukh Khan च्या ‘जवान’ मध्ये झळकणार 'ही' मराठमोळी अभिनेत्री

Shah Rukh Khan Jawan Marathi Actress : शाहरुख खानच्या जवान चित्रपटाचा नुकतचं मोशन पोस्टर प्रदर्शित झालं आहे. चित्रपटाचं पोस्टर प्रदर्शित होताच शाहरुखच्या सगळ्या चाहत्यांना आनंद झाला आहे. त्यासोबत आता एक मराठमोळी अभिनेत्री शाहरुखसोबत स्क्रिन शेअर करणार या बातमीनं त्याच्या मराठी चाहत्यांना देखील आनंद झाला आहे. 

दिक्षा पाटील | Updated: May 8, 2023, 12:22 PM IST
Shah Rukh Khan च्या ‘जवान’ मध्ये झळकणार 'ही' मराठमोळी अभिनेत्री title=
(Photo Credit : Gauri Khan Instagram)

Shah Rukh Khan Jawan Marathi Actress : बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानला किंग खान म्हणून ओळखतात. शाहरुख हा नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतो. नुकताच त्याचा आगामी चित्रपट ‘जवान’ चं मोशन पोस्टर प्रदर्शित झालं आहे. या वेळी चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारिख बदलण्यात आल्याचे सांगितले आहे. शाहरुखच्या या चित्रपटात एक मराठमोळी अभिनेत्री झळकणार आहे. स्वत: त्या अभिनेत्रीनं सोशल मीडियावर चित्रपटाचं पोस्टर प्रदर्शित झालं आहे. 

जवान या चित्रपटात मराठमोळी अभिनेत्री गिरीजा ओक गोडबोले झळकणार आहे. चित्रपटाचं हे मोशन पोस्टर शेअर करत तिनं कॅप्शन दिलं की, गेली दोन वर्ष गाळलेला घाम, अश्रू आणि रक्त… अखेर माझा चित्रपट, आपला चित्रपट लवकरच चित्रपटगृहात प्रदर्शित होणार', असे कॅप्शन तिने या फोटोला दिले आहे. गिरीजाची ही पोस्ट व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांनी तिला शुभेच्छा दिल्या आहेत. एका मराठी अभिनेत्रीला शाहरुखसोबत स्क्रिन शेअर करताना पाहण्यासाठी लोक उत्सुक आहेत. तर गिरीजानं आणखी एक पोस्टर शेअर करत 'जवान 7 सप्टेंबरला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार! आम्ही जे तयार केलं आहे ते तुम्हाला दाखवण्यासाठी प्रतीक्षा करू शकत नाही!” कॅप्शन दिले आहे.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

दरम्यान, गिरीच्या पोस्टवर कमेंट करत अनेक सेलिब्रिटींनी तिला शुभेच्छा दिल्या आहेत. अभिनेत्री अमृता खानविलकरनं रेड हार्ट आणि टाळ्या वाजवल्या आहेत. तर प्रिया बापट कमेंट करत म्हणाली तुला खूप खूप शुभेच्छा. फक्त प्रिया आणि अमृतानाही तर गायक अवधूत गुप्ते, स्पृहा वरद, मिथिला पालकर, अभिजित खांडकेकरनं कमेंट करत गिरीजाला चित्रपटासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.  

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

'जवान' या चित्रपटाविषयी बोलायचे झाले तर या चित्रपटाचे दिग्दर्शन दाक्षिणेतील लोकप्रिय दिग्दर्शक अॅटलीनं केलं आहे. शाहरुखसोबत या चित्रपटात अभिनेत्री नयनतारा मुख्य भूमिकेत दिसत आहे. या चित्रपटाच्या निमित्तानं शाहरुख आणि नयनतारा पहिल्यांदा मोठ्या पडद्यावर एकत्र दिसणार आहेत. या चित्रपटात सान्या मल्होत्रा आणि दाक्षिणात्य अभिनेता विजय सेतुपती देखील दिसणार आहे. सगळ्यांचा चाहता अल्लू अर्जुनची या चित्रपटात पाहुण्या कलाकाराची भूमिका असेल असं म्हटलं जात आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

हेही वाचा : King Charles III यांच्या राज्याभिषेक सोहळ्यात सोनमचं भाषण; पाहून अनेकजण म्हणतात, पाचवीतलं पोर यापेक्षा बरं लिहितं...

शाहरुखच्या कामाविषयी बोलायचं झालं तर तो सगळ्यात शेवटी 'पठाण' या चित्रपटात दिसला होता. चित्रपटानं जगभरातील बॉक्स ऑफिसवर 1 हजार कोटींची कमाई केली आहे. या चित्रपटात शाहरुख खानसोबत दीपिका पदुकोण आणि जॉन अब्राहम महत्त्वाच्या भूमिकेत दिसले होते.