लग्नाच्या पहिल्याच दिवशी पत्नी गौरीला सोडून 'या' लोकप्रिय अभिनेत्रीला भेटायला गेला होता Shahrukh Khan

Shahrukh Khan नं त्याच्या लग्नाच्या पहिल्याच दिवशी गौरीला सोडले आणि थेट गेला त्या अभिनेत्रीला भेटायला...

Updated: Dec 24, 2022, 02:48 PM IST
लग्नाच्या पहिल्याच दिवशी पत्नी गौरीला सोडून 'या' लोकप्रिय अभिनेत्रीला भेटायला गेला होता Shahrukh Khan title=

Shahrukh Khan Left Wife Gauri Khan On Wedding's First Night : बॉलिवूडचा किंग खान म्हणजेच अभिनेता शाहरुख खान (Shah Rukh Khan) हा लोकप्रिय कलाकारांपैकी एक आहे. शाहरुख हा बॉलिवूडचा रोमान्स किंग आहे. शाहरुख आणि त्याची पत्नी गौरी (Shahrukh Khan And His Wife Gauri) यांची जोडी तर नेहमीच चर्चेत असते. त्यांचे अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होताना दिसतात. बऱ्याचवेळा शाहरुख त्याच्या खासगी आयुष्याविषयी अनेक गोष्टी सांगताना दिसतो. दरम्यान, गौरीशी लग्न झाल्यानंतर लग्नाच्या पहिल्या रात्री शाहरुख गौरीला सोडून बॉलिवूडची ड्रीम गर्ल म्हणजेच हेमा मालिनी (Hema Malini) यांना भेटायला गेला होता. (Shah Rukh Khan Marriage) 

मीडिया रिपोर्ट्सनुसार, शाहरुख खान आणि गौरी खान यांचं लग्न हे 25 ऑक्टोबर 1991 रोजी झालं होतं. जेव्हा शाहरुखचं लग्न झालं त्यावेळी तो त्याच्या करिअरमध्ये संघर्ष करत होता. हेमा मालिनी या एका चित्रपटाची निर्मिती करणार होत्या. तो चित्रपट म्हणजे 'दिल आशना'. या चित्रपटात हेमा मालिनी यांनी अभिनेत्री दिव्या भारती (Divya Bharti) यांना कास्ट केले होते. आता प्रश्न होता तो अभिनेत्याचा... त्यासाठी हेमा मालिनी यांच्या लक्षात शाहरुखचे नाव आले. अशात हेमा मालिनी यांची इच्छा होती की शाहरुख आणि धर्मेंद्र (Dharmendra) यांची भेट व्हावी. यामुळेच हेमा मालिनी यांनी वेळ पाहिली नाही आणि शाहरुख खानला लगेचच सेटवर बोलावले. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

हेमा मालिनी यांनी फोन करून बोलावल्यानंतर कोण आहे जो लगेच जाणार नाही. हेमा मालिनी यांनी बोलावल्यामुळे शाहरुख खान चित्रपटाच्या सेटवर पोहोचला. यावेळी शाहरुखची पत्नी गौरी खान देखील हेमा मालिनी यांना भेटण्यासाठी सेटवर गेली होती. मात्र, सेटवर पोहोचल्यानंतर शाहरुख खान आपल्या कामात व्यस्त झाला आणि गौरी पूर्णवेळ खुर्चीवर बसून त्याची वाट पाहत होती. 

हेही वाचा : 'अभिषेक मला मुळीच आवडत नाही...', म्हणणाऱ्या वादग्रस्त लेखिकेला अभिनेत्याचं सडेतोड उत्तर

दरम्यान, लवकरच शाहरुखचा 'पठाण' (Pathaan) हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट 25 जानेवारी 2023 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. शाहरुख खान या चित्रपटात भरपूर अॅक्शन करताना दिसणार आहे. या चित्रपटातील 'बेशरम रंग' (Besharam Rang) या गाण्यातील दीपिकाच्या (Deepika Padukone) लूकमुळे सोशल मीडियावर मोठा वाद सुरू आहे. हा वाद फक्त सोशल मीडियावरपर्यंत राहिला नाही तर यावर अनेक मंत्र्यांनी त्यांची प्रतिक्रिया दिली आहे.