सकाळ-सकाळ प्रियांकाच्या घरी धडकली ED, दार उघडताच जे पाहिलं ते धक्कादायक...

सकाळ-सकाळ प्रियांकाच्या ED ने  घरी जे पाहिलं ते अत्यंत धक्कादायक...  

Updated: Oct 3, 2022, 12:28 PM IST
सकाळ-सकाळ प्रियांकाच्या घरी धडकली ED, दार उघडताच जे पाहिलं ते धक्कादायक...

Priyanka Chopra : अभिनेत्री प्रियांका चोप्रा (Priyanka Chopra) सध्या मुलीसोबत मातृत्वाचा आनंद घेत आहे. प्रियांका मुलगी मालती मेरीसोबत फोटो शेअर करत चाहत्यांना सतत अपडेट देत असते. पण एक काळ असा होता जेव्हा प्रियांकाच्या प्रेमप्रकरणांच्या चर्चा तुफान रंगल्या. प्रियांकाचं नाव एकेकाळी अभिनेता अक्षय कुमार (Akshay Kumar) आणि शाहिद कपूर (Shahid Kapoor) यांच्यासोबत जोडले गेलं. पण एकवेळ अशी आली जेव्हा शाहीद आणि प्रियांकाच्या नात्याच्या चर्चेचा विषय सर्वत्र गाजला होता. (Priyanka Chopra with Shahid Kapoor)

शाहिद कपूर आणि प्रियांका चोप्रा 2009 मध्ये प्रदर्शित झालेल्या प्रसिद्ध 'कमिने' (Kaminey) सिनेमामध्ये एकत्र दिसले. या सिनेमाचं दिग्दर्शन विशाल भारद्वाज (Vishal Bhardwaj) यांनी केलं. या सिनेमानंतरच दोघांच्या अफेअरच्या चर्चांनी जोर धरला. 

दरम्यान, प्रियांका आणि शाहिदकडे सर्वांचे लक्ष वेधून घेणारी घटना घडली. एके दिवशी सकाळी 7.30 वाजता आयकर विभागाने प्रियंका चोप्राच्या घरावर छापा टाकला आणि तेव्हा दरवाजा शाहिद कपूरने उघडल्यामुळे सर्वत्र खळबळ माजली. (income tax raid at priyanka chopra house )

यामुळे हे प्रकरण तुफान चर्चेत आलं, सकाळी शाहिद प्रियांकाच्या घरी काय करत होता? अशी विचारणा दोघांकडे करण्यात आली. तेव्हा यावर स्पष्टीकरण देत प्रियंका म्हणाली, 'ईडीच्या अधिकाऱ्यांना पाहून मी घाबरली, त्यामुळे मी शाहिदला मदतीसाठी बोलावलं...'

पण दोघांचं नातं अधिक काळ टिकलं नाही. अखेर प्रियांका आणि शाहिदचे मार्ग मोकळे झाले. ब्रेकअपनंतर प्रियांकाने गायक निक जोनस (nick jonas) आणि शाहिदने मीरा राजपूतसोबत (Mira Rajput) लग्न केलं. आज दोघे त्यांच्या आयुष्यात अत्यंत आनंदी आहेत.