ईशानने असं काय केलं ज्यामुळे Shahid Kapoor म्हणतोय, 'मर्द बनो मर्द...'

शाहीद कपूर छोट्या भावाला देतोय मोलाचा सल्ला; ईशानच्या 'या' कृत्यानंतर अभिनेता म्हणतोय 'वो तुम्हारी मर्दानगी को ललकार कर चली गई'  

Updated: Dec 12, 2022, 12:47 PM IST
ईशानने असं काय केलं ज्यामुळे Shahid Kapoor म्हणतोय, 'मर्द बनो मर्द...' title=

Shahid Kapoor with ishaan khattar : शाहिद कपूर (Shahid kapoor) आणि त्याचा भाऊ ईशान खट्टर (Ishaan Khattar) यांच्यातील नातं सर्वांनाच माहिती आहे. दोघं भाऊ एकमेकांवर खूप प्रेम करतात. अनेकदा दोघांचे मस्ती करतानाचे व्हिडीओ समोर आले. (shahid kapoor with ishaan khattar on instagram) आता देखील दोघांचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. पण शाहिदने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये शाहीदची पत्नी मीरा राजपूत (mira rajput) देखील दिसत आहे. 

व्हिडीओमध्ये, शाहिद कपूरने पत्नी मीरा आणि भाऊ इशानसोबत एक मजेदार व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये तिघेही आमिर खानच्या 'दिल चाहता है' सिनेमातील आयकॉनिक सीन शूट करताना दिसत आहेत. व्हिडीओच्या सुरुवातीला मीरा ईशान खट्टरला काहीतरी समजावताना दिसत आहे, पण जेव्हा ईशान तिचं ऐकत नाही तेव्हा ती चिडते आणि दीराला कानशीलात मारते. (shahid kapoor wife mira rajput brother ishaan khattar funny video)

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

मीरा चिडल्यानंतर ईशान शाहीदकडे येतो. तेव्हा शाहिद छोट्या भावाला दुजोरा देतो आणि म्हणतो,  ‘मर्द बनो मर्द. वो तुम्हारी मर्दानगी को ललकार कर चली गई.’ त्यानंतर ईशान पुन्हा मीराकडे येतो. तेव्हा मीरा ईशानला कानशीलात मारते. सध्या मीरा, शाहीद आणि ईशानचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. 

तिघांच्या व्हिडीओवर एक युजर कमेंट करत म्हणाला, 'प्रचंड क्यूट कुटुंब आहे...' तर अन्य एका युजर म्हणाला,  'बॉन्डिंग कमलची आहे...' सध्या त्यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. व्हिडीओ पोस्ट होताच काही तासांनी 1 मिलियन पेक्षा जास्त चाहत्यांनी तिघांचा व्हिडीओ पाहिला आहे.