Video : सौदी अरेबियात उमराह केल्यानंतर Shahrukh Khan पोहोचला वैष्णोदेवीला

Shahrukh Khan चा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. 

Updated: Dec 12, 2022, 12:19 PM IST
Video : सौदी अरेबियात उमराह केल्यानंतर Shahrukh Khan पोहोचला वैष्णोदेवीला title=

Shahrukh Khan In Vaishno Devi : बॉलिवूड अभिनेता किंग खान (King Khan) म्हणजेच शाहरुख खान (Shahrukh Khan) हा लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक आहे. काही दिवसांपूर्वी शाहरुखचा सौदी अरेबियात मक्कामध्ये उमराह करतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. तर नुकताच शाहरुखचा वैष्णोदेवी मंदिरातील एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. शाहरुखच्या या अंदाजनं प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. 

हेही वाचा : 'सर्वांनी मिळून माझ्यावर...', करण जोहरच्या चित्रपटाला नकार देण्याविषयी Aishwarya Rai चा खुलासा

शाहरुखचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. शाहरुखला रविवारी कटरा येथे स्पॉट करण्यात आले होते. यावेळी शाहरुख सुरक्षेसह वैष्णोदेवीला पोहोचला आहे. यावेळी त्याच्यासोबत काही मित्र देखील दिसत होते. कोणी त्याला ओळखू नये म्हणून शाहरुखनं चेहऱ्यावर मास्क लावला होता. रिपोर्ट्सनुसार, मंदिराचे दर्शन घेतल्यानंतर शाहरुख खान आज मुंबईला परतणार आहे. (Shahrukh Khan Vaishno Devi)

पाहा शाहरुखचा व्हिडीओ

शाहरुख बऱ्याच काळानंतर चित्रपटातून पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर पदार्पण करणार आहे. पठाणबद्दल बोलायचं झालं तर चाहत्यांमध्ये बरीच चर्चा सुरु आहे. या चित्रपटात शाहरुखसोबत दीपिका पदुकोण (Deepika Padukone)  आणि जॉन अब्राहम (John Abraham) देखील मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. शाहरुखचा 'पठाण' (Pathan) हा चित्रपट 25 जानेवारी 2023 रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट हिंदी, तमिळ आणि तेलगू भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटातील एक गाणं नुकतंच प्रेक्षकांच्या भेटीला आलं होतं. शाहरुखचे लांब कुरळे केस आणि जबरदस्त फिटनेस पाहून चाहत्यांना वेड लागले आहे. आता शाहरुखचे चाहते हे फक्त 25 जानेवारीच्या प्रतिक्षेत आहेत. (shahrukh khan visit maa vaishno devi mandir before pathaan release)