Pathaan मध्ये शाहरुख खानसोबत Salman ला पाहून प्रेक्षक झाले भावूक म्हणाले, 'मेरे करण-अर्जुन आ गए'

Shahrukh Khan आणि Salman Khan या दोघांना इतक्या वर्षांनंतर मोठ्या स्क्रिनवर पाहून चाहत्यांना आनंद झाला आहे. 

Updated: Jan 26, 2023, 12:31 PM IST
 Pathaan मध्ये शाहरुख खानसोबत Salman ला पाहून प्रेक्षक झाले भावूक म्हणाले, 'मेरे करण-अर्जुन आ गए' title=

Shahrukh Khan and Salman Khan In Pathaan : बॉलिवूडचा किंग खान म्हणजेच अभिनेता शाहरुख खान (Shahrukh Khan) त्याच्या 'पठाण' (Pathaan) या चित्रपटामुळे चर्चेत आहे. हा चित्रपट काल प्रदर्शित झाला आहे. प्रेक्षक गेल्या अनेक दिवसांपासून या चित्रपटाची प्रतिक्षा करत होते. चित्रपट प्रदर्शित होण्याआधीच आगाऊ बुकिंग करण्यात आली होती. चित्रपटानं पहिल्याच दिवशी बक्कळ कमाई केली. यावेळी प्रेक्षकांना फक्त शाहरुखला मोठ्या पडद्यावर पाहायला मिळाले नाही. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे चित्रपटात टायगरची (Salman Khan) एण्ट्री पाहून चाहत्यांना करण-अर्जुनची आठवण आली आहे. चित्रपटात सलमान खाननं (Salman Khan in Pathaan) पाहुण्या कलाकाराची भूमिका साकारली आहे. 

'पठाण'मध्ये सलमान खानची ग्रॅन्ड एण्ट्री झाली आहे. टायगरला पाहून चाहत्यांना हे प्रचंड आवडले. चित्रपटातील सलमानच्या एन्ट्रीचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. पठाणमधील सलमानच्या पाहुण्या कलाकाराची भूमिका साकारली आहे. पठाणचा जीव वाचवण्यासाठी टायगर त्याच्या मदतीला धावून येतो.

हेही वाचा : Pathaan Boxoffice Collection Day 1 : 'पठाण' चित्रपटानं पहिल्याच दिवशी केली छप्पर फाड कमाई!

पठाण चित्रपटात सलमान खानची एण्ट्री ही त्यानं हाताता कॉफीचा ग्लास घेऊ झाल्याचे पाहायला मिळते. गुंडांना धूळ चारल्यानंतर तो शाहरुखकडे जातो आणि त्याला कॉफीचा ग्लास देतो. शाहरुख म्हणाला, 'तू कॉफी शॉपमध्ये राहिला होतास ना? यानंतर पुढे त्यांचा संवाद सुरु राहतो. 

वादाच्या भोवऱ्यात अडकला होता पठाण 

दीपिका पदुकोण (Deepika Padukone) या चित्रपटातील 'बेशरम रंग' (Besharam Rang) या गाण्यात भगव्या बिकिनी परिधान करत बोल्ड डान्स केला होता. त्यावर अनेक धार्मिक संघटनांनी विरोध केला आणि चित्रपटावर निशाणा साधला आहे. त्यानंतर बजरंग दल, विश्व हिंदू परिषदेसह काही भाजपा नेत्यांनी यावर आक्षेप घेतला होता. दीपिका पदुकोणच्या भगव्या बिकिनीसह गाण्यातील काही वाक्यांवरही आक्षेप घेण्यात आले होते. या आक्षेपानंतर ‘सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशन’ने चित्रपट निर्मात्यांना काही बदल सुचवले. 

इतकंच काय तर बॉयकॉट 'पठाण' देखील सोशल मीडियावर ट्रेंड करू लागला होता. मात्र, चित्रपट पाहण्यासाठी गर्दी पाहता त्याचा काही परिणाम झाला नाही असे समोर आले आहे. या चित्रपटात शाहरुख भारतीय गुप्तहेराच्या भूमिकेत आहे. तर चित्रपटात दीपिका आणि जॉन अब्राहम  (John Abrahm) यांच्याही मुख्य भूमिका आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन सिद्धार्थ आनंद आहे.