Girlfriend च्या घरासमोर Shah Rukh Khan करायचा ते काम, जाणून तुम्हाला ही बसेल आश्चर्याचा धक्का

Shah Rukh Khan आणि गौरी खान त्यांच्या वैवाहिक आयुष्यात सुखी आहेत. त्या दोघांच्या लग्नाला 32 वर्षे  झाली आहेत. दरम्यान, लग्ना आधी शाहरुख त्याच्या गर्लफ्रेंडच्या घरासमोर जाऊन गाणं गायचा त्याचं हे करणं त्याची पत्नी गौरी खानला आवडत नव्हते. याचा खुलासा शाहरुखनं एका मुलाखतीत केला होता. त्याचा व्हिडीओ आता समोर आला आहे.

Updated: Mar 4, 2023, 07:02 PM IST
Girlfriend च्या घरासमोर Shah Rukh Khan करायचा ते काम, जाणून तुम्हाला ही बसेल आश्चर्याचा धक्का title=

Shahrukh Khan used to sing gori tera gaon bada pyaar for girlfriend : बॉलिवूडचा किंग खान अशी ओळख असणारा शाहरुख खान (Shahrukh Khan) हा लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक आहे. शाहरुख हा गेल्या काही दिवसांपासून त्याच्या 'पठाण' (Pathaan)  या चित्रपटामुळे चर्चेत होता. शाहरुख खान आणि त्याची पत्नी गौरी खान (Gauri Khan) यांची जोडी ही बॉलिवूडमधील पावर कपलपैकी एक आहे. लग्नाच्या इतक्या वर्षांनंतरही ते दोघे एकत्र आहेत. त्यांच्या लग्नाला किती वर्षे झाली असतील अस प्रश्न जर तुम्हाला आहे तर त्यांच्या लग्नाला तब्बल 32 वर्षे उलटी आहेत. शाहरुखनं जेव्हा नुकतंच अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं होतं तेव्हा त्या दोघांनी लग्न केलं होतं. बघता बघता इतकी वर्षे उलटली तरी त्यांच्यातील प्रेम हे कमी झालेलं नाही... पण तुम्हाला माहितीये लग्नाआधी शाहरुख गर्लफ्रेंड गौरीच्या घरासमोर जाऊन तिला चिडवण्यासाठी काय करायचा? 

लग्नाच्या आधी म्हणजेच जेव्हा शाहरुख आणि गौरी रिलेशनशिपमध्ये होते. तेव्हा ते खूप लहान आणि मज्जा मस्ती करत रहायचे. आयडियल कपल म्हणून शाहरुख आणि गौरीकडे तेव्हा पासून त्यांचे मित्र पाहतात. जेव्हा गौरी शाहरुखला सोडून तिच्या मैत्रिणींसोबत मुंबईत आली होती तेव्हा शाहरुखनं तिचा कसं शोधलं हे आपल्या सगळ्यांना माहित आहे. त्यात सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्या काळी फोन ही खूप मोठी गोष्ट होती आणि खूप कमी लोकांकडे असायची. अशात आपल्याकडे फोन नसताना शाहरुखनं गौरीला शोधून दाखवलं होतं. सध्या सोशल मीडियावर शाहरुखचा एक व्हिडीओ व्हायरल होतोय. या व्हिडीओत गौरीला डेट करत असताना शाहरुख खाननं काय काय केलं ते त्यानं सांगितलं आहे. 

पाहा व्हिडीओ - 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

शाहरुख आणि गौरी जेव्हा रिलेशनशिपमध्ये होते तेव्हा ते खूप तरुण होते. त्यावेळी ज्या प्रकारे इतर मुलं रिलेशनशिपमध्ये असताना काही विचित्र काम करतात त्याप्रमाणे शाहरुख कशी विचित्र काम करायचा याचा खुलासा त्यानं केला आहे. शाहरुख म्हणाला जेव्हा तो गौरीसोबत रिलेशनशिपमध्ये होता, तेव्हा तिच्या घराच्या एरियात तो 'गोरी तेरा गांव बड़ा प्यारा' हे गाणं गायचा. हे गाणं ऐकताच गौरीला प्रचंड राग देखील यायचा. 

हेही वाचा : कोर्ट मॅरेजनंतर आता Swara Bhaskar चा मोठा निर्णय!

व्हिडीओत शाहरुख म्हणाला, "1984 साली जेव्हा मी 19 वर्षांचा होतो त्यावेळी त्या वयात मुलं जे करतात ते सगळं मी केलं. मला एक मुलगी आवडत होती आणि त्यावेळी मी ज्या शब्दाचा वापर करायचो त्यामुळे आम्ही रिलेशनशिपमध्ये आलो. मुलीचं नाव गौरी होतं, ती पंचशीलमध्ये रहायची आणि मी हौज खासमध्ये. तर मी तिच्या घरी जायोच किंवा परिसरात जायचो जिथे सगळे प्रेमी भेटायचे म्हणजेच गार्डन, डिस्को किंवा मग हॉटेल. तेव्हा मी तिला तिच्या घराच्या परिसरात भेटल्यावर तेच गाणं गायचो कारण तिला भेटणं म्हणजे खूप कठीण होतं. मी 'गोरी तेरा गांव बड़ा प्यारा' हे माझ्या पत्नीला कधीच आवडलं नाही. (आता ती माझी पत्नी आहे.) तिला हे सगळं खूप चीप वाटायचे."