टेलिव्हिजनवर शक्तिमान पुन्हा परतणार

मुकेश खन्ना पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे...

Updated: Jun 27, 2019, 08:25 PM IST
टेलिव्हिजनवर शक्तिमान पुन्हा परतणार  title=

मुंबई : नव्वदीच्या दशकात टेलिव्हिजनवर लोकप्रिय असलेली 'शक्तिमान' ही मालिका पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या मालिकेत अभिनेता मुकेश खन्ना यांनी 'शक्तिमान' या भारतातील पहिल्या सुपरहिरोची भूमिका साकारली होती. 'शक्तिमान'मधील अमानवी शक्ती असलेल्या पात्रांमुळे ही मालिका अल्पावधीतच घराघरात जाऊन पोहोचली होती. या मालिकेचे शीर्षगीतही विशेष गाजले होते. 

या सगळ्यामुळे मुकेश खन्ना यांना नवी ओळख मिळाली होती. तत्पूर्वी महाभारत मालिकेतील भीष्मांच्या भूमिकेमुळे मुकेश खन्ना प्रचंड लोकप्रिय झाले होते. याशिवाय, त्यांनी रंगभूमी आणि हिंदी चित्रपटांमध्येही काम केले होते. 

गेल्यावर्षीच शक्तिमान ही मालिका 'अॅमेझॉन प्राइम'वर आली होती. नव्वदीच्या दशकात डीडी नॅशनलवरील ही सर्वाधिक कमावणारी मालिका होती. १३ सप्टेंबर १९९७ ते २७ मार्च २००५ या कालावधीत ही मालिका प्रसारित झाली होती.