शाल्मली खोलगडेच्या लग्नाचे रोमांटिक फोटो

शाल्मली खोलगडेच्या पतीचा फोटो अखेर समोर

Updated: Nov 30, 2021, 11:59 AM IST
शाल्मली खोलगडेच्या लग्नाचे रोमांटिक फोटो

मुंबई : गायिका शाल्मली खोलगडे  बॉयफ्रेन्ड  फरहान शेखसोबत लग्न केलं आहे. शाल्मली आणि फरहान सहा वर्षांपासून  एकमेकांना डेट करत होते. अखेर सहा वर्षांनंतर त्यांनी लग्न केलं आहे.  फरहान मुंबईत मिक्सिंग आणि मास्टरींग इंजिनिअर म्हणून काम करतो. शाल्मली आणि फरहान यांनी अत्यंत गुपित पद्धतीने लग्न केलं. 

सहा वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर दोघांनी 22 नोव्हेंबर रोजी नात्याला नवं नाव दिलं आहे.

फोटोमध्ये दोघे प्रचंड सुंदर दिसत आहे. सध्या त्यांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. गुपचूप लग्न केल्यानंतर शाल्मली आणि फरहानने त्यांच्या मित्रमंडळींसाठी रिसेप्शन पार्टी आयोजित केली आहे. 1 डिसेंबर रोजी दोघे मित्रांना रिसेप्शन पार्टी देणार असल्याचं सांगण्यात येत आहे. शाल्मली आणि फरहानच्या नात्याहबद्दल सांगायचं झालं तर दोघे सहा वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये होते. 

शल्मली आणि फरहानच्या विवाह सोहळ्यात अवघ्या 15 जणांची उपस्थिती होती. शाल्मलीबद्दल सांगायचं झालं तर ती प्रसिद्ध गायिका आहे. तिने परशान (इशकजादे), दारू देसी (कॉकटेल) आणि बालम पिचकारी (ये जवानी है दिवानी) सारखी अनेक हिट गाणी गायली आहेत. तिने म्युझिक रिऍलिटी शो, 'इंडियन आयडॉल ज्युनियर' आणि 'सूर नवा ध्यास नवा'मध्ये परीक्षकाची जबाबदारी पार पाडली.