दिशाच्या दिवाळी लूकमुळे सोशल मीडियावर फटाके

तिने उचललं हे पाऊल

Updated: Nov 7, 2018, 11:13 AM IST
दिशाच्या दिवाळी लूकमुळे सोशल मीडियावर फटाके

मुंबई : सोशल मीडियावर गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असणारा एक हॅशटॅग म्हणजे #Diwali. दिवाळी या सणाचा उत्साह सध्या शिगेला पोहोचला असून, कलाविश्वातही याचा उत्साह पाहायला मिळत आहे. सेलिब्रिटी मंडळी त्यांच्या परिने विविध कल्पना लढवत चाहत्यांना दिवाळीच्या शुभेच्छाही देत आहेत. पण, यामध्येच एका अभिनेत्रीच्या पोस्टमुळे काही नेटकरऱ्यांनी नाराजी व्यक्त केल्याचं पाहायला मिळालं. 

ती अभिनेत्री म्हणजे दिशा पटानी. दिशाने दिवाळीच्या शुभेच्छा देत तिचा एक मादक फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला. या फोटोमध्ये दिशाच्या सौंदर्यावर सर्वांच्या नजरा खिळल्या. पण, तिचा दिवाळी लूक मात्र काहींना खटकला. 

'सुकृती अँड आकृती कोट्यूर'कडून डिझाईन करण्यात आलेल्या सुरेख लेहंग्याला दिशाने चोळी ऐवजी Calvin Klein bra-letची जोड दिली होती. 

चौकटीबाहेरील संकल्पना आणि तोही या सणाच्या वातावरणात.... ही बाब काही नेटकऱ्यांना रुचली नाही. ज्यानंतर तिच्यावर पोस्टच्या कमेंट बॉक्स मध्ये अनेकांनीच आगपाखड केल्याचं पाहायला मिळालं. 'दिवाळीला कोणी असे कपडे घालतं का?',  'हा काय वेडेपणा आहे...', असं म्हणत तिला ट्रोल करण्यास सुरुवात केली. 

दिशापर्यंत मात्र हे ट्रोल काही पोहोचू शकत नाही आहेत. कारण एका जाहिरातीच्या निमित्ताने करण्यात आलेल्या या पोस्टच्या कमेंट्स तिने हाईड केल्या आहेत. त्यामुळे दिशाची ही चाल नक्कीच ट्रोलर्ससाठी तिच्याकडून देण्यात आलेलं एक उत्तर आहे, असं म्हणणं वावगं ठरणार नाही.

 
 
 
 

A post shared by disha patani (paatni) (@dishapatani) on

दिशाने ही पोस्ट एका उत्पादनाच्या जाहिरातीसाठी केली होती. मुख्य म्हणजे याआधीही तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन अशा पद्धतीच्या पोस्ट पाहायला मिळाल्या असून त्याला अनेक लाइक्स आणि शेअरही मिळाले आहेत. पण, दिवाळीच्या निमित्ताने तिचा हा लूक मात्र चाहत्यांना रुचला नाही हेच खरं.