Devara Song Daavudi: जान्हवी कपूरच्या डान्सवर बॉयफ्रेंड फिदा, डान्स पाहून म्हणाला, 'अप्सरा हो तुम...'

बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर सुपरस्टार ज्युनिअर एनटीआरसोबत तिचा आगामी चित्रपट 'देवारा'मध्ये दिसणार आहे. या चित्रपटातील एक गाणं नुकतंच रिलीज झालं आहे. ज्यामध्ये जान्हवी कपूरने दमदार डान्स केला आहे. ज्यावर आता तिचा बॉयफ्रेंड शिखर पहाडियाची प्रतिक्रिया व्हायरल होत आहे. 

सोनेश्वर पाटील | Updated: Sep 7, 2024, 12:33 PM IST
Devara Song Daavudi: जान्हवी कपूरच्या डान्सवर बॉयफ्रेंड फिदा, डान्स पाहून म्हणाला, 'अप्सरा हो तुम...'

Devara Song Daavudi: बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूरच्या 'देवारा' चित्रपटामधील गाण्याने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. ज्युनिअर एनटीआरसोबत तिचा आगामी चित्रपट 'देवरा' 27 सप्टेंबर 2024 रोजी रिलीज होणार आहे. या चित्रपटाद्वारे जान्हवी कपूर साऊथ फिल्म इंडस्ट्रीत पदार्पण करणार आहे. आता या चित्रपटातील एक गाणं रिलीज झालं आहे. या गाण्यात एनटीआर आणि जान्हवी कपूरचा दमदार डान्स पाहायला मिळत आहे. 

Add Zee News as a Preferred Source

चाहत्यांना देखील आता या दोघांची केमिस्ट्री आवडू लागली आहे. असं म्हटलं जात आहे की या चित्रपटाच्या गाण्याची कोरियोग्राफी खूप वेगळी आहे. हे गाणं रिलीज झाल्यानंतर सोशल मीडियावर जान्हवी कपूरचे कौतुक होत आहे. तिचा या गाण्यातील डान्स आणि एक्सप्रेशन उत्कृष्ट आहे. आता जान्हवी कपूरचा अफवा असलेला बॉयफ्रेंड शिखर पहाडियाची तिच्या डान्सवर प्रतिक्रिया आली आहे. जी सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. 

जान्हवी कपूरच्या डान्सवर शिखर पहाडियाची प्रतिक्रिया 

अभिनेत्री जान्हवी कपूर आणि शिखर पहाडिया यांचे नाते आता कोणापासून लपून राहिलेले नाही. 'देवरा' चित्रपटातील एक गाणं रिलीज झालं आहे. या गाण्यामधील जान्हवीचा डान्स व्हिडीओ शिखर पहाडियाने त्याच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर करताना एक खास कॅप्शन दिलं आहे. सध्या त्याच्या कॅप्शनची जोरदार चर्चा होत आहे. त्याने म्हटलं आहे की, 'वाह वाह वाह, अप्सरा हो तूम या कोई परी'. जान्हवी कपूरच्या या डान्सवर शिखर पहाडियाने दिलेली ही प्रतिक्रिया सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

अभिनेत्री जान्हवी कपूर आणि शिखर पहाडियाचे प्रेम आता लपून राहिलेले नाही. असं चाहत्यांचे मत आहे. 'देवरा'मध्ये ज्यूनियर एनटीआर व्यतिरिक्त जान्हवी कपूर, सैफ अली खान देखील मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. सोशल मीडियावर देखील या चित्रपटाची जोरदार चर्चा सुरु आहे. 

About the Author

Soneshwar Patil

सोनेश्वर भगवान पाटील हे 'झी 24 तास' डिजिटलमध्ये सिनिअर सब एडीटर पदावर कार्यरत आहेत. त्यांना मीडिया क्षेत्राचा 7 वर्षांचा अनुभव आहे. वयाच्या 20 व्या वर्षी त्यांनी TV9 मराठी News चॅनलमधून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. तिथे त्यांना लेखन आणि रिपोर्टिंगचा मौल्यवान अनुभव मिळाला. तेव्हापासून त्यांनी डिजिटल मीडियासह व्हिडिओ प्रोड्यूसर म्हणून अनेक वर्ष काम केलं आहे. यामध्ये मनोरंजन, राजकीय घडामोडी, स्पोर्ट्स, टेक, व्हायरल व्हिडिओ तसेच राशी भविष्यसह चाणक्य नीति अशा या सर्व क्षेत्रांमध्ये त्यांनी काम केलं आहे.

...Read More