मुंबई : सध्या पॉर्नोग्राफी प्रकरणामुळे अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती आणि उद्योजक राज कुंद्रा वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. राज कुंद्राचं कनेक्शन पॉर्नोग्राफी प्रकणात उघड झाल्यानंतर शेट्टी आणि कुंद्रा कुटुंब मोठ्या अडचणीत आले आहेत आहेत. शिवाय या चर्चेत शिल्पा शेट्टीची बहिण शमिता शेट्टीच्या चर्चांना उधान आलं आहे. शिल्पा आणि शमिता बद्दल सांगायचं झालं तर दोघी सर्वांना सिस्टर गोल्स देत असतात. कोणत्याही वाईट आणि कठीण प्रसंगी दोघी एकमेकांच्यासोबत उभ्या असतात.
पण फार कमी लोकांना माहिती आहे, बहिणीच्या एका गोष्टीमुळे शिल्पाला असुरक्षित वाटयचं . शमिताने अभिनेता शाहरूख खान स्टारर 'मोहबत्ते' चित्रपटाच्या माध्यमातून कलाविश्वात पदार्पण केलं. या चित्रपटासाठी तिला 'स्टार डेब्यू ऑफ द ईयर' पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आलं होतं. शमिताला 'मेरे यार की शादी हैं' चित्रपटातील 'शरारा शरारा' गाण्याच्या माध्यमातून तुफान लोकप्रियता मिळाली.
शमिताच्या लोकप्रियतेत वाढ होवू लागली आणि दुसरीकडे शिल्पाच्या मनात असुरक्षितता निर्माण होवू लागली. याबाबतील शिल्पाने एका मुलाखतीत खुलासा देखील केला, 'मला कायम वाटायचं शमिता माझ्यापेक्षा सुंदर आहे. अधिक गोरी आहे. शिवाय ती उत्तम डान्सर देखील आहे. मी सांगते शमिताने जेव्हा डेब्यू केलं तेव्हा मला वाटलं की मला कोणी संधी देणार नाही.'
शमिताच्या खासगी आयुष्याबद्दल सांगायचं झालं तर, राज कुद्राला अटक झाल्यानंतर शमिता सतत चर्चेत आहे. 19 जुलै रोजी पोर्नोग्राफी प्रकरणात राजला अटक करण्यात आली. सध्या या प्रकरणी तपास सुरू आहे.