अज्ञात व्यक्तीचा शिल्पाच्या गाडीत घुसण्याचा प्रयत्न, कारण जाणून व्हाल हैराण

मुलगीसोबत असताना शिल्पावर कठीण प्रसंग... व्हायरल व्हिडीओतून सत्य समोर   

Updated: Apr 17, 2022, 03:21 PM IST
अज्ञात व्यक्तीचा शिल्पाच्या गाडीत घुसण्याचा प्रयत्न, कारण जाणून व्हाल हैराण title=

मुंबई : सेलिब्रिटींसोबत फोटो काढण्यासाठी प्रत्येक चाहता फार उत्सुक असतो... चाहत्यांची उत्सुकता पाहाता सेलिब्रिटी देखील फोटो काढण्यासाठी तयार होतात, पण काही वेळा अशा घटना घडतात, जेव्हा सेलिब्रिटी प्रचंड संतापतात. असं काही झालं आहे अभिनेत्री शिल्पा शेट्टीसोबत. सध्या शिल्पाचा एक व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. 

स्मृती खन्ना यांनी कोकोमेलोन थीमवर आपल्या मुलीचा वाढदिवस साजरा केला. यावेळी शिल्पा शेट्टीशिवाय अनेक सेलेब्स पोहोचले होते. ऑनलाइन व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये, पार्टी संपल्यानंतर शिल्पा शेट्टी आणि समिषा कारच्या दिशेने जातात.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

यावेळी पापाराझीही तिथे हजर असतात आणि फोटोग्राफर समीशाला बाय करतात. तेव्हा समीशा देखील त्यांना बाय-बाय करते.. पण त्याठिकाणी असलेला शिल्पाचा एक चाहता सेल्फी घेण्यासाठी तिच्या गाडीत घुसण्याचा प्रयत्न करतो...

चाहत्याचं असं कृत्य पाहून शिल्पा संतापते आणि चाहत्याला म्हणते, ‘क्या कर रहे हो भाई....', त्यानंतर शिल्पाचा चाहता बाजूला होतो. सध्या शिल्पाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.