मुंबई : अभिनेत्री शिल्पा शेट्टी-कुंद्रा कायम सोशल मीडियावर आपल्या फिटनेसचे व्हिडीओ टाकत असते. यावेळी शिल्पाने कार्डिओ किक बॉक्सिंगचा व्हिडिओ शेअर केला. शिल्पा तिच्या फिटनेस ट्रेनर यश्मीन चौहानसह हा वर्कआऊट करताना दिसतेय. हे एक शक्तिशाली कॉम्बो असून ते ग्लूट्स आणि पायांवर वर्कआऊट करतं इतकंच नाही तर हृदय आणि फुफ्फुसांची स्थिती सुधारण्यास मदत करत असल्याचं शिल्पाचं म्हणणं आहे. लांब विकेंडनंतरच्या नव्या आठवड्यातलं परफेक्ट किकस्टार्ट असं कॅप्शन शिल्पाने या व्हिडीओला दिलं.
शिल्पाबद्दल सांगायचं झालं तर, ती कायम सोशल मीडियावर सक्रिय असते. फिटनेसने अनेक व्हिडीओ आणि टिप्स चाहत्यांसोबत शेअर करत ती सर्वांना फिट राहण्याचं अवाहन करते..