Shilpa Shetty असं करणार Raj Kundra चं स्वागत... सोशल मीडियावर मीम्स व्हायरल

पोर्नोग्राफी प्रकरणात राज कुंद्राला जामीन मंजूर 

Updated: Sep 21, 2021, 10:42 AM IST
Shilpa Shetty असं करणार Raj Kundra चं स्वागत... सोशल मीडियावर मीम्स व्हायरल

मुंबई : व्यावसायिक आणि अभिनेत्री शिल्पा शेट्टीचे पती राज कुंद्राला पोर्नोग्राफी प्रकरणी जामीन मंजूर झाला आहे. तब्बल 62 दिवसांनंतर राज कुंद्रा कारागृहातून बाहेर येणार आहे. पॉर्न फिल्म बनवणे आणि ते रिलीज करण्याच्या आरोपाखाली राज कुंदाला अटक करण्याच आली होती. 

राज कुंद्राला 50 हजाराच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर करण्यात आला आहे. राज कुंद्राला जामीन मंजूर होताच अभिनेत्री शिल्पा शेट्टीने सोशल मीडियावर पहिली भावना व्यक्त केली आहे. यानंतर सोशल मीडियावर अनेक मीम्स देखील व्हायरल होऊ लागलेत. 

लोकांनी केले अजब-गजब पोस्ट 

लोक ट्विटर आणि इन्स्टाग्रामवर वेगवेगळ्या प्रकारचे मजेदार पोस्ट करत आहेत. लोकांनी शिल्पा शेट्टी आणि राज यांची खिल्ली उडवणारे अनेक मीम्स पोस्ट केले आहेत. राज कुंद्रा तुरुंगातून परतल्यानंतर त्यांचे स्वागत कसे केले जाऊ शकते हे या मेम्समध्ये लोकांनी व्हायरल केले आहेत.

एका मीममध्ये शिल्पा शेट्टी सिलिंडर घेऊन उभी दिसते. हा फोटो शेअर करताना युजरने लिहिले की, शिल्पा शेट्टी रोलिंग पिनने राजचे स्वागत करेल. मिया खलिफाचे छायाचित्र पोस्ट करताना दुसऱ्या एका युझरने लिहिले, 'या उद्योगात तुमचे स्वागत आहे.' एका व्यक्तीने स्पष्ट शब्दात लिहिले, 'पॉर्न इंडस्ट्रीचे तारे राज यांचे खुलेआम स्वागत करतील.'

राज कुंद्राला जामीन मंजूर, शिल्पा शेट्टीची पहिली प्रतिक्रिया

'मोठ्या वादळानंतरही चांगल्या गोष्टी घडतात', असं लिहित शिल्पानं एक फोटो तिच्य़ा इन्स्टा स्टोरीमध्ये शेअर केला. मुंबई उच्च न्यायालयाकडून सोमवारी राज कुंद्रा याला जामीन मंजूर करण्यात आला. अश्लील व्हिडीओ प्रकरणी 50 हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर त्याला जामीन मंजूर करण्यात आला. 19 जुलै रोजी कुंद्राला रात्री उशीरा ताब्यात घेण्यात आलं होतं. दरम्यान, कुंद्रासोबतच त्याचा साथीदार रायन थोरपे यालाही जामीन मिळाला आहे. सदर प्रकरणी मुंबई गुन्हे शाखेच्या प्रॉपर्टी सेलनं 1500 पानांची सप्लीमेंट्री चार्जशीट दाखल करण्यात आली. मुंबई पोलिसांच्या माहितीनुसार या चार्जशीटमध्ये 43 जणांची साक्ष नोंदवण्यात आली आहे.