राज कुंद्राने खरेदी केली तब्बल 3 कोटींची कार, Luxury Car पाहून नेटकऱ्यांनी केलं ट्रोल

Raj Kundra New Luxury Car : नवी Luxury Car खरेदी केल्यामुळे राज कुंद्रा ट्रोल... 

दिक्षा पाटील | Updated: Aug 1, 2024, 04:20 PM IST
राज कुंद्राने खरेदी केली तब्बल 3 कोटींची कार, Luxury Car पाहून नेटकऱ्यांनी केलं ट्रोल title=
(Photo Credit : Social Media)

Raj Kundra New Luxury Car : बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा नवरा आणि बिझनेसमॅन राज कुंद्रा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. अनेक विविध वादांच्या भोवऱ्यात अडकलेल्या राज कुंद्रानं नवी गाडी खरेदी केली आहे. त्यानं खरेदी केलेल्या या गाडीची किंमत 3 कोटी आहे. त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. 

सेलिब्रिटी फोटोग्राफर इन्स्टंट बॉलिवूडनं राज कुंद्राच्या या गाडीचा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत जी गाडी दिसते. लग्झरीयस इलेक्ट्रिक एसयूव्ही ही गाडी आहे. त्या गाडीची किंमत ही 3 कोटी असल्याचं म्हटलं जातं. त्याच्या या गाडीचे व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओत राज त्याचा मुलगा दिसत आहे. या ब्रिटिश लग्झरी स्पोर्ट्स कार लोटस इलेट्रे टेस्ट ड्राइव्ह केली. व्हिडीओमध्ये राज कुंद्रा हा टेस्ट ड्राइव्ह करताना दिसला. त्याच्या या हिरव्या रंगाच्या गाडीनं सगळ्यांचे लक्ष वेधले आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

या गाडीच्या वेबसाइटच्या माहितीनुसार, राजच्या या नव्या लोटस इलेट्रेची किंमत ही 2.55 कोटी रुपयांपासून सुरु होती. तर टॉप मॉडेलची किंमत ही 2.99 कोटी आहे. दरम्यान, राजकडे अनेक लग्झरी कारचं कलेक्शन असल्याचं म्हटलं जातं. घरात नवी कार पाहिल्यानंतर शिल्पा शेट्टीच्या मुलाला फार आनंद झाला. समोर आलेल्या फोटोनुसार, त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद हा सगळ्यांना स्पष्ट पाहायला मिळत आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

दरम्यान, राज कुंद्रा हा कोणत्या ना कोणत्या कारणामुळे सतत चर्चेत असतो. अलीकडेच, ईडीनं राज कुंद्राची 97.79 कोटी रुपयांची काही मालमत्ता जप्त केली होती. ईडीनं मनी लाँडरिंग कायद्याअंतर्गत ही कारवाई केली. यापूर्वी फेब्रुवारी 2021 मध्ये मुंबई पोलिसांनी एका पॉर्न रॅकेटचा पर्दाफाश केला होता. फेब्रुवारीमध्ये मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेनं त्याला अश्लील चित्रपट बनवून वेगवेगळ्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित करण्याविरोधात गुन्हा दाखल केला होता.

त्यानंतर पोलिसांनी वेगवेगळ्या ठिकाणी छापेमारी केली होती. या दरम्यान, पोलिसांनी ज्या चार लोकांना अटक केली आणि त्यांच्याशी चौकशी केली तर त्यावेळी राज कुंद्राचं नाव समोर आलं होतं. त्याचं आधारावर राज कुंद्राला अटक करण्यात आली आहे. त्यावेळी राज कुंद्रावर मॉडेल पूनम पांडे, अभिनेत्री आणि मॉडेल शर्लिन चोप्रा आणि अभिनेत्री सागरपिका शोना सुमननं कधी गंभीर आरोप केले. राज कुंद्राला पॉर्नोग्राफी प्रकरणात तुरुंगवास भोगावा लागला होता. 

हेही वाचा : अखेर बलात्कार प्रकरणावर बोलला अरमान मलिक, म्हणाला 'लोकांना..'

दरम्यान, राज कुंद्रा हा सोशल मीडियावर ट्रोल होत आहे. एक नेटकरी म्हणाला, 'बिझनेसमध्ये चांगली वाढ होते, वाटतं.' दुसरा नेटकरी म्हणाला, 'त्याला खूप जास्त नफा झाल्याचे दिसते.' तिसरा नेटकरी म्हणाला, 'पुन्हा कोणत्या चित्रपटाची शूटिंग झाली असं वाटतंय.'