'... ही बदनामी नव्हे?', कंगना प्रकरणी राऊतांचा सवाल

न्यायालयानं कंगनाच्या बाजुनं निकाल दिल्यानंतर ... 

Updated: Nov 27, 2020, 07:45 PM IST
'... ही बदनामी नव्हे?', कंगना प्रकरणी राऊतांचा सवाल  title=

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणौत kangana ranaut हिच्या मुंबईतील घरावर आणि कार्यालयावर पालिकेनं केलेल्या कारवाई प्रकरणी उच्च न्यायालयानं मुंबई महानगरपालिकेला फटकारलं. पालिकेची नोटीस रद्द ठरवत न्यायालयाकडून कंगनाला मोठा दिलासा मिळाला.

अतिशय महत्त्वाच्या मुद्द्यावर न्यायालयानं दिलेल्या या यानंतर कंगनानं लगेचच प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली. ट्विट करत तिनं पालिकेला चिमटे काढले. इतकंच नव्हे तर हा, लोकशाहीचा विजय असल्याची प्रतिक्रिया दिली. 

इथं, न्यायालयानं कंगनाच्या बाजुनं निकाल दिल्यानंतर विरोधकांनी मुंबई महानगरपालिकेत सत्तेवर असणाऱ्या शिवसेनेला धारेवर धरण्यास सुरुवात केली. तर, तिथं शिवसेना नेते संजय राऊत sanjay raut यांनी पुन्हा एकदा खडा सवाल उपस्थित करत कंगनाच्या माफिया आणि पीओके वक्तव्याचाच मुद्दा अधोरेखित करत तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली. 

 

'या अभिनेत्रीनं मुंबई पोलिसांना माफिया आणि मुंबईला पीओके म्हटलं होतं. न्यायालयाच्या निर्णयाच्या प्रतिक्षेत असणारे आता याच्याशी सहमत आहेत का?', असं विचारत मुंबई आणि महाराष्ट्राविषयी अशोभनीय वक्तव्य करणं म्हणजे बदनामी नव्हे का? असा खडा सवालच त्यांनी उपस्थित केला. तेव्हा आता राऊतांनी उपस्थित केलेल्या या प्रश्नावर कंगना काही उत्तर देते का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.