आलियाने सगळ्यांसमोर बॉडीगार्डला फटकारलं

आलियाचा व्हिडिओ व्हायरल 

Updated: Sep 19, 2019, 08:09 AM IST
आलियाने सगळ्यांसमोर बॉडीगार्डला फटकारलं  title=

मुंबई : आलिया भट्ट सध्या आपल्या सिनेमाबरोबरच अभिनेता रणबीर कपूरच्या रिलेशनशिपबद्दल खूप चर्चेत आहे. सध्या तिचा रणबीरला मिठी मारतानाचा व्हिडीओ देखील व्हायरल झाला होता. आलिया अनेकदा तिच्या चाहत्यांसोबत अगदी सहज वावरताना दिसते. 

पण तिचा सध्या एक असा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये ती आपल्या बॉडीगार्डला फटकारताना दिसत आहे. आलियाचा व्यवहार हा कायमच सौम्य राहिलेला आहे. पण असं काय झालं? की ज्यामुळे आलियाला आपल्या बॉडीगार्डला सगळ्यांसमोर ओरडावं लागलं. 

आलियाचा हा व्हिडिओ सध्या प्रचंड व्हायरल झाला आहे. या व्हिडिओत आलिया भट्ट आपल्या सिनेमाच्या सेटवर पोहोचल्याचं दिसत आहे. तिचे फॅन्स अगदी सुरूवातीपासूनच तिची सेटवर वाट पाहताना दिसत असताना ती गाडीतून उतरताच बॉडीगार्ड तिला घेरून घेतात. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

#aliabhatt on location

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani) on

हीच गोष्ट आलियाला खटकलेली दिसत आहे. आलिया कारमधून उतरताच मीडियाकडे पाहून हसते मात्र पुढे जाऊन ती बॉडीगार्डवर भडकते. होतं असं की, आलिया मागे राहते आणि याची जाणीव बॉडीगार्डला पुढे गेल्यावर होते. त्यानंतर ते लगेच मागे येतात पण हेच आलियाला खटकतं आणि ते त्यांच्यावर भडकते.

आलियाचा हा व्हिडिओ इंस्टाग्रामवर व्हायरल झाला असून चाहत्यांनी त्यावर अनेक प्रतिक्रिया दिल्या आहे. काहींनी म्हटलंय की, तू समोरच्याचा आदर केलास तरच तुझा आदर केला जाईल. सिनेमा आणि पैशाने आलिया भारावली आहे यासारखे अनेक कमेंट्स केल्या आहेत.