Shraddha Kapoor च्या भावाला ड्रग्ज प्रकरणात अटक

बॉलिवूडमध्ये ड्रग्सचं सत्र सुरुचं... आणाखी एका सेलिब्रिटीला ड्रग्स प्रकरणी अटक  

Updated: Jun 13, 2022, 11:24 AM IST
Shraddha Kapoor च्या भावाला ड्रग्ज प्रकरणात अटक title=

मुंबई : बॉलिवूडमधून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. अभिनेत्री श्रद्धा कपूरचा भाऊ आणि अभिनेता शक्ति कपूरचा मुलगा सिद्धांत कपूरला अटक करण्यात आली आहे.  ड्रग्ज प्रकरणात सिद्धांत कपूरला अटक करण्यात आली. बंगळुरु पोलिसांनी या प्रकरणी कारवाई केली. मेडिकल टेस्टमध्ये सिद्धांत कपूरनं ड्रग्ज घेतल्याचं उघड झालं आहे.  सिद्धांत कपूरला बंगळुरुच्या उलसुरु पोलीस स्टेशनमध्ये आणण्यात आलंय.  

श्रद्धा कपूरच्या भावाला बेंगळुरूमध्ये पोलिसांनी ताब्यात घेतले आहे, त्याच्यावर ड्रग्ज घेतल्याचा आरोप आहे. पोलिसांनी छापा टाकल्यानंतर सिद्धांतला ताब्यात घेण्यात आलं.  

मिळालेल्या माहितीनुसार, ड्रग्ज टेस्टमध्ये श्रद्धा कपूरच्या भावासह एकूण सहा जणांनी ड्रग्स घेतल्याचं समोर आलं आहे. सिद्धांतसोबत असलेले सहा जण बंगळुरूच्या एमजी रोडवर असलेल्या हॉटेलमध्ये पार्टी करत होते. तेथे पोलिसांनी छापा टाकला.