श्रेयस तळपदेच्या पत्नीला स्वाईन फ्लूची लागण

पावसामुळे वातावरणातील होत असलेल्या बदलांमुळे राज्यांतील अनेक भागांमध्ये स्वाईन फ्लूचे रुग्ण आढळून येतायत. अभिनेता श्रेयस तळपदेच्या पत्नीलाही स्वाईन फ्लूची लागण झाल्याचे समजतेय.

Updated: Jul 20, 2017, 04:15 PM IST
श्रेयस तळपदेच्या पत्नीला स्वाईन फ्लूची लागण

मुंबई : पावसामुळे वातावरणातील होत असलेल्या बदलांमुळे राज्यांतील अनेक भागांमध्ये स्वाईन फ्लूचे रुग्ण आढळून येतायत. अभिनेता श्रेयस तळपदेच्या पत्नीलाही स्वाईन फ्लूची लागण झाल्याचे समजतेय.

अंधेरीतील एका रुग्णालयात तिच्यावर उपचार सुरु आहेत. प्राथमिक तपासात तिला स्वाईन फ्लू असल्याचे समोर आल्याने तिच्यावर उपचार सुरु आहेत. 

दरम्यान, पोश्टर बॉईज या मराठी सिनेमाचा हिंदी रिमेक तयार करण्यात येत असल्याने श्रेयस या कामात बिझी आहे तसेच गोलमाल सिरीजमधील सिनेमातही तो भूमिका करणार आहे. त्यामुळे या कामाच्या गडबडीत त्याला पत्नीला हवा तितका वेळही देता येत नाहीये.