वयाच्या 42 व्या वर्षी Shweta Tiwari दिसते खुपच स्टायलिश... फोटोंनी वाढवलं इंटरनेटचं तापमान

श्वेता तिवारी तिच्या सौंदर्य आणि फिटनेसमुळे दररोज चर्चेत असते. 

Updated: Oct 15, 2022, 07:51 PM IST
वयाच्या 42 व्या वर्षी Shweta Tiwari दिसते खुपच स्टायलिश... फोटोंनी वाढवलं इंटरनेटचं तापमान title=

Shweta Tiwari Latest Photoshoot: सौंदर्याच्या बाबतीत बॉलीवूड अभिनेत्री काही कमी नाहीत, त्यातून सध्या चर्चा असते ती टेलिव्हिजन अभिनेत्रींची. यातीलच एक अभिनेत्री आहे आणि ती म्हणजे श्वेता तिवारी. आपल्या स्टायलिश आणि ग्लॅमरस लुकनं ती कायमच प्रेक्षकांना मोहित करत आली आहे, नुकतेच तिनं आपले नवं फोटोशूट सोशल मीडिया शेअर केले आहे जे सध्या प्रचंड व्हायरल होत आहे. 

श्वेता तिवारी तिच्या सौंदर्य आणि फिटनेसमुळे दररोज चर्चेत असते. श्वेता 42 वर्षांची आहे, तिची मुलगी पलक तिवारी देखील 22 वर्षांची आहे, परंतु श्वेताला पाहून तुम्ही तिच्या वयाचा अंदाज लावू शकणार नाही. श्वेताने निळ्या डेनिम पँटवर पांढरा क्रॉप टॉप घातला आहे, ज्यामध्ये ती खूप सुंदर दिसत आहे.

आणखी वाचा - गव्हापासून नाही तर चण्याच्या डाळीच्या पोळ्या ठरतील आरोग्यदायी... पाहा फायदे

श्वेताचा हा नवा लुक पाहून चाहते तिची प्रसंशा करताना दिसत आहेत. लोकांचा विश्वास बसत नाहीये की वयाच्या 42 व्या वर्षी कोणी इतकं तरुण कसं दिसू शकतं. एका मुलाखतीत श्वेताने सांगितले होते की तिच्यासाठी वय कधीच मॅटर करत नाही. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

श्वेता तिवारीची मुलगी पलकही आहे खुपच ग्लॅमरस...
श्वेता तिवारीची मुलगी पलक तिवारी चित्रपटांमध्ये येण्यापूर्वीच सतत चर्चेत असते. पलक केवळ तिच्या स्टायलिश इमेजमुळेच चर्चेत नाही तर तिच्या गाण्यांमुळेही अनेकदा चर्चेत असते. तर काही महिन्यांपूर्वी रिलीज झालेल्या तिच्या गाण्याचीही सर्वदूर चर्चा पसरली होती. हे गाणे रिलीज होताच पलकची सगळीकडे चर्चा सुरू झाली होती. 

आणखी वाचा - Aryan आणि Suhana Khan खानला पाहून नेटकऱ्यांचा संताप; 'एअरपोर्टवर...'

पलक बोल्डनेसच्या बाबतीत इतकी चर्चा होते की ती सोशल मीडियावर एकापेक्षा एक किलर फोटो शेअर करत असते. पलक तिवारी तिच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनमध्ये असा ड्रेस घालून आली होती की तो फोटो पाहून चाहत्यांनाही घाम फुटला होता. हा व्हिडीओ आणि फोटो तिनं इन्टाग्रामवर शेअर केला आहे.