'शेरशाह' चित्रपटातील किसिंग सीनबद्दल सिद्धार्थ मल्होत्रा म्हणाला...

सिद्धार्थ मल्होत्रा-कियारा अडवाणी स्टारर 'शेरशाह' चित्रपटाने चाहत्यांच्या मनात एक वेगळे स्थान निर्माण केले आहे.

Updated: Sep 23, 2021, 12:48 PM IST
'शेरशाह' चित्रपटातील किसिंग सीनबद्दल सिद्धार्थ मल्होत्रा म्हणाला...

मुंबई : अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा आणि अभिनेत्री कियारा अडवाणी स्टारर 'शेरशाह' चित्रपटाने चाहत्यांच्या मनात एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. खऱ्या आयुष्यात देखील एकमेकांना डेट करत असलेल्या कियारा आणि सिद्धार्थच्या चित्रपटातील केमेस्ट्रीला चाहत्यांनी डोक्यावर घेतलं. चित्रपटाच्या यशानंतर सिद्धार्थ आणि कियारा कपिल शर्माच्या 'द कपिल शर्मा शो'मध्ये उपस्थित राहिले. तेव्हा कपिलने दोघांना वेग-वेगळे प्रश्न विचारून आनंदमय वातावरण तयार केलंय.

कपिल सिद्धार्थला विचारतो, 'शेरशाह चित्रपटात एक चांगला सीन आहे. तो एक सीन कथेची गरज होती की तुमचं क्रिएटि्व्ह इनपूट होतं?' यावर सिद्धार्थ म्हणाला, 'चित्रपटातील 90 टक्के सीन कॅप्टन विक्रम बात्रा यांच्या आयुष्यावर आधारित आहे.' त्यानंतर कपिल म्हणतो उरलेल्या 10 टक्क्यांबद्दल काय?

पुढे सिद्धार्थ म्हणतो, 'भूमिकेसाठी आम्हाला सर्व काही करावं लागलं. फार कठीण होतं... काही सीन बळजबरी करावे लागले...' सध्या कपिल शर्मा शोमधील हा भाग तुफान व्हायरल होत आहे. कियारा आणि सिद्धार्थबद्दल सांगायचं झालं तर ते दोघे एकमेकांना डेट करत आहेत. दोघे रिलेशनशिपमध्ये आहेत. पण दोघांपैकी एकाने देखील त्यांच्या नात्याला दुजोरा दिलेला नाही.