हा आम्हाला काहीच...', सुप्रसिद्ध गायकाचे कोणावर गंभीर आरोप?

अभिजित भट्टाचार्य यांनी शाहरुख खानसाठी अनेक सुपरहिट गाणी गायली आहेत.

Updated: Oct 30, 2022, 06:56 PM IST
हा आम्हाला काहीच...', सुप्रसिद्ध गायकाचे कोणावर गंभीर आरोप? title=

Abhishek Bhattacharya on Shahrukh Khan: हल्ली बॉलिवूडमध्ये अनेक प्रकारचे आरोप - प्रत्यारोप करणं सुरू असतं. मध्यंतरी मीटू प्रकरण (Mee too) वैगेरे गोष्टींनी बॉलिवूडचं (Bollywood) वातावरण तापवलं होत. कधी मानधनावरून वाद तर कधी कुणाच्या वक्तव्यांवरून वाद. अशी अनेक प्रकरणे बॉलिवूडमध्ये पेटलेली पाहायला मिळाली. आपल्या गोड आणि आकर्षक आवाजाने चाहत्यांना वेड लावणाऱ्या अभिजीत भट्टाचार्य (Abhijeet Bhattacharyya) यांचे नाव नव्वदच्या दशकातील सर्वात लोकप्रिय गायक म्हणून ओळखले जाते तेही अशा वादांपासून दूर राहिलेले नाहीत. अभिजित भट्टाचार्य यांनी आपल्या चित्रपट कारकिर्दीत (Songs) एकापेक्षा एक उत्तम गाणी आपल्या आवाजाने दिली आहेत. अभिजित भट्टाचार्य आज 64 वा वाढदिवस (Birthday) साजरा करत आहेत. मात्र एकदा अभिजीतने शाहरुख खानची (Shah Rukh Khan) खिल्लीही उडवली आहे. जाणून घेऊया नेमकं ते प्रकरण काय होतं? (singer abhishek bhattacharya says shahrukh khan doesnt give credit to singers)

अभिजित भट्टाचार्य यांनी शाहरुख खानसाठी अनेक सुपरहिट गाणी गायली आहेत. बॉलिवूडमध्ये एक काळ असा होता जेव्हा अभिजित भट्टाचार्यला शाहरुख खानचा आवाज म्हटले जायचे. त्या काळात ते सर्वाधिक मानधन (Highest Paid Singers in Bollywood) घेणारे गायक बनले होते.

हेही वाचा - Samantha Ruth Prabhu ची डिमांड आणखी वाढली... आता घेणार 'इतके' कोटी रूपयांचं मानधन?

मात्र एका मुलाखतीत शाहरुख खानची खिल्ली उडवत ते म्हणाले, 'जोपर्यंत मी शाहरुखसाठी गात होतो तोपर्यंत तो 'रॉकस्टार' होता, मात्र जेव्हा मी त्याच्यासाठी गाणी गाण्याचं सोडलं तेव्हापासून तो 'लुंगी डान्स'कडे वळला.' अशी खिल्ली उडवत शाहरूख खानवर त्यांनी टीका केली होती. या टीकेमागे एक कारण होतं. 

हेही वाचा - टेलिव्हिजन अभिनेत्रीकडून बॉलिवूडची पोलखोल... नेपोटिझमवर केलं खरमरीत वक्तव्य

अभिजित भट्टाचार्य यांनी शाहरुखवर आरोप करताना असेही म्हटले होते की, 'शाहरुखने त्याच्या 'मैं हूं ना' (Mein Hoon Na) या चित्रपटात अभिनेत्यापासून ते सर्वाना स्पॉट बायचे श्रेय दिले. परंतु गायकांना दिले नाही. 'ओम शांती ओम' (Om Shanti Om)चित्रपटातही त्यानं तसेच केले. 

'वादा रहा सनम' (Vada Raha Sanam) मधून अभिजीत भट्टाचार्यला पहिल्यांदा यश मिळाले. अभिजीत यांनी 'इश्क' (Ishq) मधील 'हमको तुमसे प्यार है', 'बादशाह' मधील 'बादशाह ओ बादशाह', 'वो लड़की जो', 'मैं हूँ ना' मधील 'तुम्हे ना' यासारंखी अनेक गाणी गायली आहेत. 'बेवफा' चित्रपटातील 'इश्क चुपता नहीं' आणि जुडवा (Judwa) मधील 'तन ताना टन' यांचा समावेश आहे.