मुंबई : सिंगर-रॅपर सिद्धू मूसेवाला आणि बॉलिवूडचा प्रसिद्ध गायक KK यांच्या निधनानंतर कलाविश्वाला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. दिल्लीत राहणारा गायक आणि संगीतकार शील सागरने जागाचा अखेरचा निरोप घेतला आहे. वयाच्या अवघ्या 22 व्या वर्षी शीलने त्याचा प्रवास संपवला. शिलच्या मृत्यूचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. 'इफ आई ट्राइड'या गाण्याने शीलला खूप लोकप्रियता मिळाली.
दिल्लीत राहणाऱ्या संगीतकारांनी त्याच्या निधनाची माहिती सोशल मीडियावर दिली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, शील सागरचे बुधवारी (1 जून) निधन झालं. त्यांच्या मृत्यूचे कारण उघड होऊ शकले नाही. त्याच्या मित्रांनी सोशल मीडियावर या दुःखद बातमीला दुजोरा दिला आहे.
'आजचा दिवस खूप दुःखाचा आहे... आधी KK आणि नंतर हा संगीतकार ज्याने #wickedgames गाण्यावर आपल्या परफॉर्मन्सने सर्वांची मने जिंकली. ' हे ट्विट सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
Today is a sad day.. first KK and then this beautiful budding musician who had we in awe with his rendition of my favourite song #wickedgames.. may you rest in peace #SheilSagar. https://t.o3n93WlitS
— Viraj Kalra (virajkalra) June 1, 2022
शीलच्या निधनानंतर एका उभरत्या कलाकाराने जगाचा निरोप घेतल्याने संगीत विश्वाचं मोठं नुकसान झालं आहे.. असं म्हणायला हरकत नाही. सोशल मीडियावर अनेकांनी शीलला श्रद्धांजली वाहिली आहे.