मुंबई : गेल्या 6 महिन्यांपासून सोनाली बेंद्रे न्यूयॉर्क सिटीमध्ये कर्करोगावर उपचार घेत होती. सोनालीने आपल्याला कॅन्सर झाल्याची माहिती सगळ्यांना दिली. सोनाली उपचार घेऊन भारतात परतली आहे. आता सोनालीने सोशल मीडियावर एका व्यक्तीचे आभार मानले आहेत.
सोनाली जेव्हा उपचार घ्यायला न्यूयॉर्कला गेली तेव्हा तिच्यासोबत बहीण रूपा रणदिवे देखील होती. सोनालीच्या बहिणने या दरम्यान सोनालीची खूप काळजी घेतली. तिचे आभार म्हणून तिने सोशल मीडियावर शेअर केली एक भावनिक पोस्ट....
सोनाली आता आपल्या घरी परत आली आहे. भारतात आल्याचा आनंद तिच्या चेहऱ्यावर दिसत आहे. सोनालीचा कॅन्सर बरा झाला असून तिची प्रकृती उत्तम आहे. आजार पुन्हा होऊ शकतो म्हणून रेग्युलर चेक अप करावे लागणार आहे.
उपचार, वेदना, दु:ख आणि तरीही न डगमगणारं तिचं धैर्य या साऱ्या गोष्टी पाहून सोनालीच्या धाडसी वृत्तीची दाद द्यावी तितकी कमीच अशी प्रतिक्रियाही अनेकांनी दिली.
आपल्या घरी आल्यानंतर सोनाली जणू काही एका वेगळ्याच विश्वात आली होती. याचा अंदाज तिची सोशल मीडिया पोस्ट पाहून सहज लावता येत आहे. सोनाली घरी परतल्यानंतर सर्वांनीच तिचं स्वागत केलं. यात ती सर्वात जास्त कोणाच्या आठवणीने व्याकूळ होती, तो म्हणजे तिच्यापाशी असणारी Icy नावाची पाळीव कुत्री.