सोनम कपूर प्रेग्नेंट? व्हिडिओमुळे चाहते गोंधळात

भारतात दाखल होताचं सोनम कपूर ट्रोल 

Updated: Jul 16, 2021, 12:27 PM IST
सोनम कपूर प्रेग्नेंट? व्हिडिओमुळे चाहते गोंधळात  title=

मुंबई : अभिनेत्री सोनम कपूर सध्या तुफान चर्चेत आहे. सोनम नुकताचं लंडनहून भारतात आली आहे. एअरपोर्टवर अभिनेते आणि वडील अनिल कपूर यांना भेटल्यानंतर भावूक झाली. एक वर्षांनंतर वडिलांना भेटल्याचा आनंद सोनमच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे झळकत होता. आता सोनमचे काही एअरपोर्टवरील फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. यामध्ये ती प्रेग्नेंट आहे, असं तिच्या काही चाहत्यांना वाटत आहे. तर दुसरीकडे काही ट्रोलर्सने सोनमला तिच्या कपड्यामुळे ट्रोल केलं आहे. 

सोनम कपूर

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओ आणि फोटोमध्ये तिने निळ्या रंगाचा ब्लू स्ट्राइप्ड स्कर्ट आणि क्रॉप टॉप घातला आहे. त्यामुळे युझर्सने सोनम कपूरच्या व्हिडिओ आणि प्रेग्नेंसीवर कमेन्ट केल्या आहेत. सोनमच्या फॅशन सेन्सवर तर एका युझरने प्रश्न उपस्थित केला आहे. 'केबिन क्रूचे कपडे उधारीवर घेतेस' अशी कमेन्ट एका युझरने केली. 

तर दुसऱ्या युझरने अशी कमेन्ट केली, 'सोनमला झिरो फॅशन सेन्स आहे, आणि स्वतःला फॅशन आयकॉन म्हणते...' सोनमला तिच्या ट्रोलर्सने ट्रोल तर केलं पण सोनमच्या चाहत्यांनी तिच्यावर प्रेमाचा वर्षाव केला. सोनम गेल्या वर्षी लंडनमध्ये गेली होती. आता ती पुन्हा भारतात आली आहे.