Arbaaz Khan-Sshura Wedding Video : अभिनेत्री मलायका अरोराला घटस्फोट दिल्यानंतर तब्बल 6 वर्षांनी अरबाज खाने रविवारी गर्लफ्रेंड आणि सेलिब्रिटी मेकअप आर्टिस्ट शुरा खानशी निकाह केला. बहीण अर्पिताच्या घरी नातेवाईक आणि जवळच्या मित्र मैत्रीणीच्या उपस्थितीत हा सोहळा रंगला. या निकाहचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. अरबाजच्या लग्नाला संपूर्ण खान कुटुंब उपस्थितीत होतं. बेस्ट फ्रेंड रविना टंडन तिच्या मुलीसोबत या सोहळ्यात सहभागी झाली होती. तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल की, सेलिब्रिटी मेकअप आर्टिस्ट शुरा खान ही रविना टंडनसाठी काम करते. अरबाजचं दुसरं लग्न असून त्यापैकी त्याचा मुलगा अरहान आणि सलमान खानची चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे.
अनेक चाहते सलमान खानला लग्नासाठी तुझा नंबर कधी लागणार असं विचारत आहेत. तर अरहान खान त्याच्या वडिलांच्या दुसऱ्या लग्नात फुल फन मोडमध्ये दिसून आला. त्याने वडील अरबाद आणि नवीन आई शौरासोबत डान्स केल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर समोर आला आहे. शिवाय नवीन वहिनीसोबत भाईजानही डान्स करताना दिसला. (Song sung with father dance with new mother Sshura son Arhaan and Salman Khan Dance Arbaaz Khan Sshura Wedding Video viral)
अरबाज खानच्या शुरासोबतच्या दुसऱ्या लग्नाचं अनेक इनसाइड व्हिडीओ सोशल मीडियावर ट्रेंडिंगमध्ये आहे. या व्हिडीओंमध्ये अरबाजचा मुलगा अरहान एन्जॉय करताना दिसला. एका व्हिडीओमध्ये अरबाज आणि त्याची नवविवाहित वधू शुरा केक कापताना दिसून येत आहे. यावेळी अरहानही वडिलांच्या आनंदात पूर्णपणे सहभागी होताना दिसून आला. व्हिडीओमध्ये सलमान खान, सोहेल खान आणि अर्पितासह संपूर्ण खान कुटुंब आनंदी दिसत होतं. केक कापल्यानंतर शुरा खानने अरबाज आणि अरहानला केक भरवला.
या लग्नात त्याचा मुलगा अरहान खानने सर्वाधिक लक्ष वेधून घेतलं आहे. यादरम्यान अरहानही त्याचं वडील अरबाजसोबत गाणे गाताना दिसला. अरहान आणि अरबाजने तेरे मस्त मस्त दो नैन गाणे गायलं.
यानंतर, व्हायरल होत असलेल्या आणखी एका व्हिडीओमध्ये अरहान, सलमान खान आणि त्याची नवीन आई शुरा खानसोबत डान्स करताना दिसत आहेत.
नेहा चौधरी या 'झी 24 तास डिजीटल'मध्ये सिनियर सब एडिटर (वरिष्ठ उपसंपादक) पदावर कार्यरत आहे. त्यांना पत्रकारिता क्षेत्रातील 20 वर्षांचा अनुभव आहे. इलेक्ट्रॉनिक आणि ऑनलाइन मीडियामध्ये प्रदीर्घ अनुभव आहे. त्यांनी पत्रकाराची सुरुवात रिपोर्टर म्हणून देशोन्नती वृत्तपत्रातून केली. राजकारणापासून मनोरंजनापर्यंत बातम्यांचा आढावा त्यांनी घेतला. 2006 मधील मुंबई लोकल ट्रेन बॉम्बस्फोट हल्ला, 26/11 मुंबई हल्ला, प्रमोद महाजन हत्या अशा अनेक घटनांचे कव्हरेज त्यांनी केलं आहे. त्यानंतर ई टीव्ही मराठीमध्येही रिपोर्टर म्हणून काम केलं. त्यानंतर मी मराठी, साम मराठी, जय महाराष्ट्र, न्यूज 18 लोकमतमध्ये अनेक वर्ष त्यांनी आऊटपूटमध्ये रनडाउन प्रोड्यूसर म्हणून काम केलं. आता त्या 'झी 24 तास डिजीटल'मध्ये कार्यरत आहेत. इथे त्या राजकारण, गुन्हेगारीपासून मनोरंजनापर्यंत ग्रामीण भागातील बातम्यांमध्ये आपलं योगदान देतात. त्यासोबत सोशल मीडियावरील व्हायरल आणि ट्रेंडिंगवरही त्या लिखाण करतात. तर आरोग्य, लाइफस्टाइल या बातम्यांमध्ये विशेष रुची आहे. तर गेल्या 2 वर्षांपासून त्यांनी ज्योतिष आणि धर्म यावर काम करत आहेत. त्यांनी हस्तरेषाशास्त्र, वास्तु आणि फेंगशुईसह वैदिक ज्योतिष, अंकशास्त्र आणि टॅरोचाही पुस्तकाच वाचन आणि तज्ज्ञांनी बोलून लोकांना माहितीपूर्ण बातम्या देतात. सण, उत्सवाचे धार्मिक आणि वैज्ञानिक महत्त्व याची त्या त्यांचा बातम्यांमधून समतोल राखतात. त्यांच्या मोकळ्या वेळेत त्यांना धार्मिक ग्रंथांच वाचन तसंच प्रवास, संगीताची आवड आहे.
...Read More|
LES
(20 ov) 81/8
|
VS |
BOT
83/4(12.3 ov)
|
| Botswana beat Lesotho by 6 wickets | ||
| Full Scorecard → | ||
|
MAS
(19 ov) 131/7
|
VS |
BRN
135/3(17.1 ov)
|
| Bahrain beat Malaysia by 7 wickets (DLS method) | ||
| Full Scorecard → | ||
|
OMA
(19 ov) 131/7
|
VS |
NEP
135/3(17.1 ov)
|
| Match Postponed | ||
| Full Scorecard → | ||
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.