Pushpa 2 मधून Allu Arjun बाहेर? रश्मिकानं शेअर केलेल्या फोटोमुळे एकच खळबळ

चित्रपटाच्या पहिल्या भागानं दमदार कामगिरी केलेली असतानाच दुसऱ्या भागाकडून प्रेक्षकांच्या अपेक्षा अर्थातच उंचावल्या. 

Updated: Aug 23, 2022, 12:35 PM IST
Pushpa 2 मधून Allu Arjun बाहेर? रश्मिकानं शेअर केलेल्या फोटोमुळे एकच खळबळ  title=
South indian movie Pushpa 2 the rule shooting starts rashmika mandanna shares photo allu arjun was absent

pushpa 2 : दाक्षिणात्य सुपरस्टार, अल्लू अर्जुन याचा ‘पुष्पा द राइज’ हा चित्रपट प्रदर्शित झाला आणि पाहता पाहता सर्वत्र या अभिनेत्याचीच जादू पाहायला मिळत होती. लहानग्यांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच या चित्रपटाचं आणि त्यातील कलाकारांचं वेड लागलं होतं. 

2021 मधील ब्लॉकबस्टर चित्रपट असणाऱ्या ‘पुष्पा द राइज’ ( pushpa the rise ) या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवरही धुमाकूळ घातला होता. चित्रपटाच्या पहिल्या भागानं दमदार कामगिरी केलेली असतानाच दुसऱ्या भागाकडून प्रेक्षकांच्या अपेक्षा अर्थातच उंचावल्या. 

अपेक्षांची पूर्तता करण्यासाठी आता या चित्रपटाची टीम पुन्हा एकदा सज्ज झाली असून, ‘पुष्पा द रूल’ अर्थात या चित्रपटाच्या दुसऱ्या भागाचं चित्रीकरण सुरु झालं आहे. 

नुकतंच चित्रपटाच्या निर्मात्यांनी (Pushpa 2 ) ‘पुष्पा द रूल: पार्ट 2’च्या पूजा समारंभातील काही फोटो सोशल मीजियावर शेअर केले. पण, त्या फोटोमध्ये चित्रपटाची स्टारकास्ट मात्र दिसली नाही. बरं, रश्मिका मंदानानं (rashmika mandanna) सोशल मीडियाच्या माध्यमातून हा फोटो शेअर केल्यामुळं ती चित्रपटाचा भाग आहे, हे स्पष्ट झालं. 

( allu Arjun) अल्लू अर्जुन मात्र या चर्चांमध्ये कुठेच दिसला नाही, रश्मिकानं शेअर केलेल्या फोटोतही तो नाही, त्यामुळं तो या चित्रपटाचा भाग नसेल का? असाच प्रश्न काही नेटकऱ्यांनी विचारला. काही तासानंतर अल्लू अर्जुन यानंही चित्रपटाच्या पूजा समारंभातील फोटो शेअर केला आणि सर्वांनाच त्यांच्या प्रश्नांची उत्तरं दिली. 

‘पुष्पा द रूल: पार्ट 2’च्या निमित्तानं अल्लू अर्जुन आणि रश्मिका पुन्हा एकदा स्क्रीन शेअर करताना दिसणार आहेत. त्यांच्याशिवाय या चित्रपटात फहद फाजिल, धनुंजया, सुनील, अनसूया भारद्वाज आणि इतर कलाकारही झळकणार आहेत.