लग्न झालेल्या अभिनेत्याच्या प्रेमात बुडाल्या होत्या श्रीदेवी, श्रीदेवीमुळे व्हायची भांडणं

८०च्या दशकात श्रीदेवी बॉलिवूडमध्ये सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्री होत्या

Updated: Apr 21, 2021, 12:41 AM IST
लग्न झालेल्या अभिनेत्याच्या प्रेमात बुडाल्या होत्या श्रीदेवी, श्रीदेवीमुळे व्हायची भांडणं

मुंबई : प्रसिद्ध अभिनेत्री श्रीदेवी यांच्या सौंदर्यावर प्रत्येकजण फिदा आहे. मात्र श्रीदेवी आधीच लग्न झालेल्या अभिनेत्याच्या प्रेमात बुडाल्या होत्या. श्रीदेवीमुळे अभिनेत्याच्या घरात भांडणं देखील सुरु झाली आणि हे प्रकरण आत्महत्येच्या प्रयत्नांन पर्यंत पोहोचलं.

श्रीदेवी यांचं खरं नाव बरंच मोठं होतं
१३ ऑगस्ट १९६३ रोजी तामिळनाडूमध्ये जन्मलेल्या श्रीदेवी यांचं पूर्ण नाव श्री अम्मा यंगर अय्यप्पन असं होतं. वयाच्या ४थ्या वर्षी त्यांनी चित्रपटांमध्ये अभिनय करायला सुरवात केली. श्रीदेवी यांनी १९६७मध्ये कंधन करुनई या चित्रपटातून पदार्पण केलं.  श्रीदेवी यांना जवळपास सर्व चित्रपट पुरस्कार मिळाले. त्यांना भारत सरकारचा चौथा सर्वोच्च सन्मान पद्मश्रीही देण्यात आला.

सर्वाधिक फी आकारणारी अभिनेत्री
५ दशकांपर्यंत बॉलिवूडवर राज्य केलेल्या श्रीदेवी यांना प्रथम महिला सुपरस्टार आणि मेगास्टारचा दर्जा देण्यात आला आहे. याचा अंदाज तुम्ही या गोष्टी वरुन लावू शकता की, 80च्या दशकात त्या बॉलिवूडमध्ये सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्री होत्या. आपल्या नावावर सातत्याने अनेक सुपरहिट सिनेमा देण्याचा विक्रम आणि त्या काळातील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपटही श्रीदेवी यांच्याच नावावर आहे.

मिथुन चक्रवर्ती यांच्या सोबत अफेअरचे किस्से
श्रीदेवी जेव्हा त्यांच्या करिअरच्या पहिल्या टप्प्यात होत्या तेव्हा त्यांच्या काळातील टॉप अभिनेते असलेले मिथुन चक्रवर्ती यांच्या त्या प्रेमात पडल्या होत्या. या दोघांनी 1984 मध्ये रिलीज झालेला 'जाग उठा इंसान', 1988मध्ये रिलीज झालेला 'वतन के रखवाले, १९८८चा 'वक्त की आवाज' आणि 1989 मधील गुरू' या चित्रपटाबरोबर अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केलं. आणि याच दरम्यान या दोघांच्या अफेअरच्या बातम्या प्रसारित होवू लागल्या.

शाहरुख खानसोबतचा ठरला शेवटचा चित्रपट
श्रीदेवी यांनी 1996 मध्ये प्रसिद्ध चित्रपट निर्माता बोनी कपूरबरोबर लग्न केलं. दोघांना जान्हवी कपूर आणि खुशी कपूर या दोन मुली आहेत. तर बोनी कपूर यांच्या पहिल्या पत्नीचा मुलगा अभिनेता अर्जुन कपूर आहे. 2018मध्ये दुबईमध्ये एका कार्यक्रमादरम्यान बाथरूममध्ये श्रीदेवी यांचं निधन झालं. श्रीदेवी यांच्या कारकीर्दीचा 'मॉम' हा सिनेमा शेवटचा ठरला. मात्र, यानंतर श्रीदेवी यांनी 2018मध्ये रिलीज झालेला शाहरुख खानच्या 'झिरो' चित्रपटात एक कॅमिओ केला होता.