शोककळा! संशयास्पद अवस्थेत आढळला लोकप्रिय अभिनेत्रीचा मृतदेह

बापरे! इतक्या निघृणपणे कोणी संपवलं अभिनेत्रीचं आयुष्य, शरीरावर कपडे सुद्धा नव्हते... 

Updated: Aug 30, 2022, 03:04 PM IST
शोककळा! संशयास्पद अवस्थेत आढळला लोकप्रिय अभिनेत्रीचा मृतदेह  title=

मुंबई : कलाकाराचं आयुष्य जितकं ताऱ्यांसाऱख चमचमणार असत, तितकच ते आकाशातल्या ताऱ्याभोवती असणाऱ्य़ा काळ्याकुंट अंधारासारख असतं. याचीच प्रचिती आपल्याला बॉलिवूडमधील अनेक कलाकारांनी अचानक जगाचा निरोप घेतल्यानंतर आली आहे. कारण अनेक कलाकारांनी आर्थिक, घरगूती व हेल्थ समस्यांमुळे आत्महत्या व अचानक मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या आहेत. काहींची हत्या झाल्याचीही चर्चा आहे. अशाच आता एका प्रसिद्ध अभिनेत्रीची हत्या झाल्याची घटना घडलीय. या घटनेने चित्रपट विश्वात खळबळ माजलीय.  

कलाकारांनी प्रसिद्धीच्या यशोशिखरावर असताना जगाचा निरोप घेतल्याच्या अनेक घटना आपण ऐकल्या आहेत. अशातच आता एका प्रसिद्ध अभिनेत्रीचा मृतदेह सापडल्याची घटना घडलीय. विशेष म्हणजे हा मृतदेह नग्न अवस्थेत सापडल्याने हत्येचा संशय व्यक्त होतोय. 

प्रसिद्ध अभिनेत्री जवळपास आठवडाभरापासून बेपत्ता होती. त्यानंतर अचानक आता एका नदीच्या किनारी तिचा मृतदेह सापडल्याची घटना घडली आहे. या घटनेने चित्रपट विश्वात खळबळ माजलीय. दरम्यान आता या प्रकरणात नेमका तिचा मृत्यू झाला आहे की हत्या करण्यात आलीय याचा पोलिस तपास करतायत. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रसिद्ध अभिनेत्रीचे नाव अनास्तासिया कोचेरेव्ह आहे. ती एक रशियन रिअॅलिटी टीव्ही स्टार आहे.रशियन डोम-2 या रिअॅलिटी डेटिंग शोमध्ये ती दिसली होती. दरम्यान गेल्या काही वर्षापासून ती आईच्या कॅन्सरच्या उपचाराचा खर्च भागवण्यासाठी ती सेक्सवर्करचं काम करत होती. अनास्तासिया गेल्या 4 दिवसांपासून बेपत्ता होती. जेव्हा ती अनेक दिवस घरी न परतल्याचे पाहून आईने पोलिसात बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली होती. 

दरम्यान आता जवळपास आठवडाभरापासून बेपत्ता असलेल्या अनास्तासियाचा मृतदेह सेंट पीटर्सबर्ग येथील नदीत सापडला आहे. तिच्या या मृतदेहावर अंडरवेअर सोडून एकही कपडा नव्हता. मृतदेह अनास्तासियाचा असल्याची पुष्टी पोलिसांनी केली आहे. आता अनास्तासियाचाच्या मृत्यूची चौकशी केली जात आहे. पोलीस तिचा मृत्यू झालाय की हत्या करण्यात आलीय याचा तपास करतायत.